लेकीच्या शिक्षणासाठी दिव्यांग पित्याची तगमग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 05:09 PM2021-02-02T17:09:16+5:302021-02-02T17:12:16+5:30

येवला : तालुक्यातील हडप सावरगाव येथील विद्यार्थीनीला शिक्षणासाठी रोज सहा किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे लक्षात येताच तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी सदर विद्यार्थीनीस सायकल भेट देवून शिक्षणातील अडसर दूर केला आहे.

Divyang's father's journey for Leki's education | लेकीच्या शिक्षणासाठी दिव्यांग पित्याची तगमग

लेकीच्या शिक्षणासाठी दिव्यांग पित्याची तगमग

Next
ठळक मुद्देहडप सावरगाव : शिक्षकांनी सायकल भेट देत थांबवली पायपीट

येवला : तालुक्यातील हडप सावरगाव येथील विद्यार्थीनीला शिक्षणासाठी रोज सहा किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे लक्षात येताच तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी सदर विद्यार्थीनीस सायकल भेट देवून शिक्षणातील अडसर दूर केला आहे.

रेंडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक सचिन वावळ एका सायकल दुकानात उभे होते. यावेळी एक दिव्यांग व्यक्ती आपल्या मुलीसाठी जुनी सायकल खरेदी करण्यासाठी आल्याचे त्यांनी पाहिले. त्यांची परिस्थिती बेताची असल्याचे त्यांना जाणवले तर भर उन्हात वीस किलोमीटरवरून स्वतःची सायकल चालवत आलेली ही दिव्यांग व्यक्ती पाहून वावळ यांनी त्यांची अधिक विचारपूस केली. शिक्षणासाठी रोज सहा किलोमीटर पायी जाणार्‍या लेकीसाठी जुनी सायकल खरेदी करणार्‍या बापाची तळमळ पाहुन वावळ यांनी मदतीचे आश्वासन दिले. शिक्षकांच्या एका व्हाटस्अप ग्रुपवर त्यांनी मदतीचं आवाहन केल्यानंतर अवघ्या तासात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि जमलेल्या पैश्यातून हडप सावरगावच्या दत्तू कोल्हे यांच्या मुलीला शिक्षणासाठी नवीन सायकल खरेदी करुन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देशमुख, गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांच्या हस्ते कोटमगाव देवी येथील प्रांगणात भेट देण्यात आली. याप्रसंगी सचिन वावळ, एकनाथ घुले, किरण पेंडभाजे, चंद्रकांत जानकर किरण जाधव, दिनेश मानकर, संतोष मुंडे, ज्ञानेश्वर पायमोडे, राजू गांगुर्डे, विकास राठोड, अजित मुळे, अंबादास शेकडे, संतोष सोनवणे, जयसिंग पिंपळे, गोपाळ तिदार, महादेव खरात, आजिनाथ आंधळे, सुभाष काटे, सुरेश तागड, विलास बांगर, कमलेश शिरोरे आदिसह शिक्षक उपस्थित होते.

वाघमारे यांच्याकडून गौरवोद‌्गार
पुरूषी मानसिकतेने ग्रासलेल्या समाजात आजही मुलींच्या शिक्षणाकडे पाहीजे तितके लक्ष पालक देताना दिसत नाहीत. पण दत्तु कोल्हे यांचा विचार व तळमळ सर्व समाजाला आदर्शवत अशी आहे. स्वतःची परिस्थिती लेकीच्या शिक्षणात अडसर ठरू नये म्हणून धडपडणारा हा बाप मुलगी आहे म्हणून मध्येच शिक्षण सोडायला लावणार्‍या अनेक सुदृढ धनदांडग्या पालकां पेक्षा विचाराने नक्कीच श्रीमंत आहे, असे गौरवोद्गार यावेळी गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांनी यावेळी काढले.
 

Web Title: Divyang's father's journey for Leki's education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.