सामाजिक संस्थांच्या वतीने दिवाळी फराळचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:36 AM2017-10-24T00:36:07+5:302017-10-24T00:36:15+5:30
दिवाळीनिमित्त विविध सामाजिक संस्था आणि सेवाभावी संघटनांच्या वतीने गरीब विद्यार्थी तसेच आदिवासी बांधवांना कपडे आणि फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला.
नाशिक : दिवाळीनिमित्त विविध सामाजिक संस्था आणि सेवाभावी संघटनांच्या वतीने गरीब विद्यार्थी तसेच आदिवासी बांधवांना कपडे आणि फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला. समाजातील गरीब विद्यार्थ्यांचा दिवाळी उत्सव द्विगुणीत करण्यासाठी बागेश्री वाद्यवृंदातील कलाकार बालअभिनेत्री श्रेया गायकवाड, गायिका शर्वरी पद्मनाभी, ऋषीकेश गायकवाड, साक्षी व रुची झेंडे यांच्या हस्ते पंचवटी परिसरातील काळाराम मंदिर तसेच विविध सिग्नलजवळील गरीब मुला-मुलींना मिठाई वाटप करण्यात आली, अशी माहिती बागेश्री वाद्यवृंदाचे संचालक चारुदत्त दीक्षित यांनी दिली. याप्रसंगी तबलावादक सुधीर करंजीकर, नाट्य कलावंत दीपक दीक्षित, ज्येष्ठ हेमंत कुलकर्णी, मीनाक्षी वाळवेकर, वेदश्री करंजीकर, सोनल अधिकारी, सोनाली सप्तर्षी आदी मान्यवर कलावंत उपस्थित होते. नॅबचे सचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
नॅब कार्यशाळेत दिवाळी
नॅब कार्यशाळेत दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी दीपावली उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सलीम शेख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी रामेश्वर कलंत्री उपस्थित होते. याप्रसंगी लाभशंकर पंड्या, राजेश नागरे, हर्षल गडकरी, मोनल महेश, अॅड. अजय निकम, राजेंद्र वाणी, जयप्रकाश मुथा यांच्या वतीने कपडे, ड्रेस, दिवाळी फराळ, मिठाई आदींची विद्यार्थ्यांना भेट देण्यात आली. यावेळी कार्यक्रमास संस्थेचे मानद सचिव गोपी मयूर, उपाध्यक्ष सूर्यभान साळुंखे, रवींद्र केडिया, रवींद्र कांगणे, संपत जोंधळे, दत्तात्रय गुळवे आदी उपस्थित होते. कार्यशाळा अध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
निरीक्षणगृहात खरी दिवाळी
शहरातील आनंद अकाउंट्सच्या विद्यार्थ्यांनी निरीक्षणगृहात खरी दिवाळी साजरी केली. यावेळी शंभर किलो फराळाबरोबरच प्लेट्स तसेच सिलिंग फॅनची दिवाळी भेट निरीक्षणगृहातील मुलांना देण्यात आली. कार्यक्रमास भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक चोपडा, अतुल आचळे, निरीक्षणगृहाचे मानद संचालक चंदुलाल शाह, भारतीय जैन संघटनेचे शहराध्यक्ष यतीश डुंगरवाल, महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष अनिल नहार, राजेंद्र बाफना आदि उपस्थित होते.
दिवाळी झाली गोड
नाशिक फटाका असोसिएशनच्या वतीने निरीक्षणगृहातील मुला- मुलींना फटाके आणि मिठाईचे वाटप करून दिवाळी गोड करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ तसेच महंत भक्तिचरणदास महाराज यांच्या हस्ते मुलांना फराळाचे वाटप करण्यात आले. व्यवसाय करताना सामाजिक जाणिवेतून काम करण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी राजू भुजबळ यांनी व्यक्त केले. तर भक्तिचरणदास यांनी मायेचा आधार देण्याचे कार्य अखंडपणे सुरू ठेवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी निरीक्षणगृहातील मुलींनी व्यापाºयांना ओवाळले. यावेळी शंकरराव बर्वे, जयप्रकाश जातेगावकर, पंकज काळे, राहुल बर्वे, प्रशांत चंद्रात्रे, अमोल बर्वे, आनंद करंजकर, योगेश सोनवरे, गणेश बर्वे, गणेश रत्न, समर्थ काळे, चंद्रात्रे, अशोक ढोले, अदित्य अक्कर, सचिन रत्ने, नरेंद्र पाटील, आकाश देसाई आदी उपस्थित होते.