आदिवासी पाड्यांवर वंचितांच्या घरी उजळली दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:01 AM2017-10-23T00:01:03+5:302017-10-23T00:17:25+5:30

शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने आदिवासी पाड्यांवरील आदिवासी बांधव, मुले यांना दिवाळीचा फराळ, कपडे व भेटवस्तू देण्यात आल्या.

 Diwali in the houses of tribal people | आदिवासी पाड्यांवर वंचितांच्या घरी उजळली दिवाळी

आदिवासी पाड्यांवर वंचितांच्या घरी उजळली दिवाळी

Next

नाशिक : शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने आदिवासी पाड्यांवरील आदिवासी बांधव, मुले यांना दिवाळीचा फराळ, कपडे व भेटवस्तू देण्यात आल्या.  कामटवाडे उत्कर्ष प्रसारक मंडळ कामटवाडेगाव गावकरी मंडळाच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मोहिमेवाडी व शिंदेवाडी आदिवासी बांधवांसमवेत एक दिवस दिवाळी साजरी करून मंडळाच्या वतीने नवीन कपडे व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी डॉ. शशीताई अहिरे, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मटाले, बाळा धाकराव, बाजीराव मटाले, वसंत जाधव, संजन सोनवणे, दत्ता डोके, नंदू गायकर, मच्छिंद्र खुटवड, रामदास मटाले, अशोक तारणे, उत्तम धोंठाडे, नंदू गांगुर्डे, अनिल गावकर, सुरेश अहेर आदी ग्रामस्थ प्रमाणात उपस्थित होते.  समता ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आदिवासींना फराळ, कपडे वाटप  दीपावली सणानिमित्त पखालरोडवरील समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी वाशाळा, प्राथमिक शाळेत ३०० आदिवासी शेतकरी, महिला, विद्यार्थी यांना दिवाळी फराळे, नवे कपडे, साड्या वाटप करून दिवाळी सण साजरा केला. व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष डॉ. श्रीराम ठाकूर, उपाध्यक्ष डी. एफ. मोरे, सचिव दीनानाथ पाटील पदाधिकारी बळवंत शिर्के , आर. आर. गरुड, शांताराम पोटे, चिंतामण अहेर अन्य सदस्य, सरपंच मनीषा भवारी, शिक्षक एम. जी. शेंडे, किशोर भवारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी संघाचे अध्यक्ष ठाकूर यांनी आदिवासींना विविध योजनांची माहिती दिली.
मुक्त विद्यापीठात श्रमिक महिलांना साड्या
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नियमित महिला कर्मचाºयांच्या अनौपचारिक ग्रुपच्या वतीने विद्यापीठ परिसरात सफाईचे काम आणि बागकाम करणाºया महिला कर्मचाºयांना साड्यांची अनोखी दिवाळी भेट देण्यात आली. विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सर्व चतुर्थश्रेणी महिला कर्मचाºयांना सन्मानाने साड्या देऊन चहापान करण्यात आले. तसेच या सर्व महिलांना डॉ. संजीवनी महाले यांनी दिवाळी भेट दिली.  काही महिलांनी प्रातिनिधिक स्वरूपात भावना व्यक्त केल्या. सामाजिक जाणिवांचे भान आणि दिवाळी सणाचे औचित्य  साधून विद्यापीठातील महिला कर्मचाºयांचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत कुलगुरू प्रा. डॉ. वायुनंदन यांनी व्यक्त केले. या कार्यक्र मास महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माधुरी देशपांडे यांनी स्वरचित कविता सादर केल्या.
अभाविपतर्फे सांस्कृतिक दिवाळी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आधाराश्रमातील मुलांबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी सांस्कृतिक दिवाळी साजरी करण्यात आली. अशोकस्तंभावरील या मुलांना अन्य साहित्याची मदत विविध संस्था देत असतात, परंतु मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक दिवाळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलांसमोर नृत्य, तबलावादन, गायन अशा कला सादर करतानाच मुलांनाही त्या शिकवण्यात आल्या. यातील अनेक मुलांनी कला क्षेत्रात करिअर करण्याचा मनोदय व्यक्त केला. या उपक्रमात अभाविपचे महामंत्री सम्राट माळवदकर, महानगरमंत्री सागर शेलार, सेवा आयाम प्रमुख वैभव गुंजाळ तसेच अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जिव्हाळा फाउंडेशनतर्फे आदिवासी पाड्यावर दिवाळी
दिवाळीच्या सणानिमित्त जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने हरसूलजवळील काकडपाडा या आदिवासी पाड्यावर फराळ, मिठाई, तसेच कापडे वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. पाड्यावरील सर्व लोकांनी यावेळी आनंद व्यक्त केला. आदिवासी पाड्यावर या दिवाळीनिमित्त लोकांना फराळ व कपडे वाटप करून एक आगळी-वेगळी दिवाळी फाउंडेशनच्या सदस्यांनी साजरी केली. आदिवासी पाड्यावर या दिवाळीनिमित्त लोकांना व कपडे वाटप करून एक आगळी वेगळी दिवाळी फाउंडेशनच्या सदस्यांनी साजरी केली. यावेळी काकडपाडाचे सरपंच व जिव्हाळा फाउंडेशनचे सदस्य गायत्री नवाल, पंकज फल्ले, कृ ष्णराव जगदाळे साहेब, अक्षय मोरे, सचिन कर्डिले, नेहा सिंग, गोरख पवार, महेश थेटे, संदीप खुळे, सुरेश पोमनार, सुधीर मुकणे, रमेश परदेशी, एकनाथ खोडे, मंगेश तायडे, प्रमोद कासट आदी सदस्य उपस्थित होते.
कर्मयोगी बहुद्देशीय सेवाभावी संस्था
कर्मयोगी बहुद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिक यांचेमार्फत दरवर्षी दीपावलीनिमित्त कर्मयोगी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमस्ते गावाजवळील अतिदुर्गम पाडे हर्षवाडी, लेकुरवाळीपाडा, दुगारवाडीपाडा या ठिकाणी आदिवासी बांधवांना दिवाळीचा फराळ व कपडे देण्यात आले. पाड्यावरील नामदेव बांगारे, सुभाष बारत व संस्थेचे अध्यक्ष पंकज पळसकर, काशीनाथ खडसे, अविनाश बाविस्कर, ऋषीकेश जंगम, भास्कर वानखेडे आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पंकज पळसकर यांनी आदिवासी बांधवांनी मुलांना शाळेत पाठवावे असे आवाहन केले.
‘चाइल्ड लाइन’ची किशोर सुधारालयात दिवाळी
 मविप्रचे समाजकार्य महाविद्यालय आणि चाइल्ड लाइन १०९८ यांनी किशोर सुधारालयातील मुलांसोबत संयुक्त दिवाळी साजरी केली. समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी भाऊबीजच्या दिवशी किशोर सुधारालयातील मुलांचे औक्षण करतानाच त्यांच्या उदंड आयुष्याची व उज्ज्वल भविष्यासाठी मनोकामना केली.  किशोर सुधारालयातील मुलांसोबतच्या या दिवाळीत सुधारालयाचे प्राचार्य श्रीकृष्ण भुसारे व चाइल्ड लाइनच्या समन्वयक प्रणिता तपकिरे उपस्थित होते. यावेळी दोन्ही संस्थांकडून सुधारालयातील मुलांना फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी सुधारालयातील मुलांच्या चेहºयावरील आनंद ओसंडून वाहताना दिसून आला. प्राचार्य विलास देशमुख, प्रा. सुनीता जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात अलेल्या या कार्यक्रमात करिश्मा सूर्यवंशी, गीतांजली पवार, गीतांजली वाघेरे, सरिता तपकिरे, माया चव्हाण आदी सहभागी झाले होते.

Web Title:  Diwali in the houses of tribal people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.