शहरात दिवाळी पाडवा, भाऊबीज साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:18 AM2018-11-11T01:18:41+5:302018-11-11T01:19:01+5:30
दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. या सणातील धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, आश्विन अमावास्या (लक्ष्मीपूजन) यानंतर येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा तथा बलिप्रतिपदा होय. गुरुवारी (दि. ८) बलिप्रतिपदा साजरी करण्यात आली. हा विक्र म संवत्सराचा वर्षारंभ दिन मानला जातो. बलिप्रतिपदा या दिवशी अभ्यंगस्नान केल्यानंतर पतीचे औक्षण करून पत्नी त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते.
नाशिक : दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. या सणातील धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, आश्विन अमावास्या (लक्ष्मीपूजन) यानंतर येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा तथा बलिप्रतिपदा होय. गुरुवारी (दि. ८) बलिप्रतिपदा साजरी करण्यात आली. हा विक्र म संवत्सराचा वर्षारंभ दिन मानला जातो. बलिप्रतिपदा या दिवशी अभ्यंगस्नान केल्यानंतर पतीचे औक्षण करून पत्नी त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते.
दरम्यान, शुक्रवारी (दि.९) भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा भाऊबीज हा सण साजरा करण्यात आला. यानिमित्त बहिणीला भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. बलिप्रतिपदेला बळीराजाचे पूजन केले जाते. बळीराजा दृष्ट नव्हता, प्रजाहितदक्ष राजा म्हणून त्याची ख्याती होती. त्याचे राज्य सुराज्य असल्याने पुन्हा असेच राज्य प्रस्थापित व्हावेत अशी लोक त्या दिवशी प्रार्थना करतात. म्हणून बहीण भावाला ओवाळताना ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो, अशी कामना करते.
बलिप्रतिपदानंतर शुक्रवारी (दि.९) भाऊबीज साजरी करण्यात आली. दिवाळी पाडवा व भाऊबीज हा भगिनीवर्गाने आपल्या भावांना औक्षण करून त्याच्या भरभराटीची दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी शुभचिंतन करण्याचा दिवस. या दिवसाला यमद्वितीया असे ही म्हणतात. यमीने आपला भाऊ यमराजाला आपल्या घरी बोलवून त्याचे औक्षण करून भोजन दिले. कितीही कष्ट पडले तरी आपली बहीण जिथे असेल तिथे म्हणजे तिच्या घरी जाऊन तिच्याकडून औक्षण करून घ्यावे तिला भेटवस्तू म्हणून साडीचोळी अन्य वस्तू देण्याची प्रथा आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात धनधान्य, समृद्धी लाभते अशी श्रद्धा आहे. भाऊ हा बहिणीच्या संरक्षणासाठी उभा आहे, अशी त्यामागची संकल्पना होय. दिवाळी पाडवा व्यापारी वर्गासाठी नवीन वर्षाची सुरु वात. या दिवशी ग्रामीण भागात काही ठिकाणी रेड्यांची मिरवणूक काढण्यात येते. पंचवटीतदेखील मिरवणूक काढण्यात आली. त्याचप्रमाणे काही ठिकाणी रेड्यांच्या शर्यती लावण्यात आल्या.