गरिबांची दिवाळी यंदा साखरेविनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:07 AM2017-10-04T00:07:49+5:302017-10-04T00:07:53+5:30
नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत लाभार्थ्यांना सणासुदीला स्वस्त दरात साखर उपलब्ध करून देणाºया सरकारने यंदा कठोर होत, फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रतिकार्ड फक्त एक किलो साखर देण्याचा निर्णय घेऊन अन्य लाखो लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. या कार्डधारकांना नियमित एक किलोच साखर मिळेल, त्यात सणासुदीच्या अतिरिक्त साखरेचा मात्र समावेश नाही.

गोरगरिब व विशेषत: वार्षिक एक लाखापेक्षा कमी उत्पन्न गटातील नागरिकांना खुल्या बाजारातील महाग अन्नधान्य तसेच साखर घेणे परवडत नसल्याने शासनाची सार्वजनिक वितरण प्रणाली गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात राबविली जात आहे.
केंद्र व राज्य सरकार मिळून अशा घटकांसाठी स्वस्त दरात रेशनवर अन्नधान्य उपलब्ध करून देत असल्याने आजही रेशनचे धान्य विकत घेऊन खाणाºयांची संख्या लाखोंंच्या घरात आहे. नाशिक जिल्ह्यात साडेसात लाख रेशन कार्डधारक असून, त्यातील निम्म्याहून अधिक कुटुंबांना दरमहा रेशनवर स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले जात आहे.
परंतु मे महिन्यापासून खुल्या बाजारात साखरेचे दर चाळीस रुपयांवर पोहोचल्यापासून राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानातून दिली जाणारी साखर बंद करून टाकली आहे. फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रतिकार्ड साखर देण्याचा निर्णय घेतला आहे.
पूर्वी रेशन कार्डवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दरमहा पाचशे ग्रॅम साखर महिन्याकाठी दिली जात होती. आता एका कार्डधारकास एक किलोच साखर देण्यास सुरुवात झाली असून, पूर्वी सणासुदीला व विशेषत: दसरा, दिवाळी सणानिमित्त गोरगरिबांना गोडधोड करून खाता यावे म्हणून प्रतिमानसी दीडशे ग्रॅम साखर अतिरिक्त उपलब्ध करून दिली जात होती. यंदा मात्र त्यालाही राज्य सरकारने कात्री लावली आहे. त्यामुळे दिवाळी गोड करायची असेल तर त्यासाठी खुल्या बाजारातील ४० रुपये दराने साखर खरेदी करावी लागणार आहे.फक्त अंत्योदय पात्रशासनाने फक्त अंत्योदय योजनेत पात्र ठरलेल्या कुटुंबीयांनाच साखर देण्याचा निर्णय घेतला असून, नाशिक जिल्ह्यातील एकूण साडेसात लाख शिधापत्रिकाधारकांपैकी पावणे दोन लाख कुटुंबे अंत्योदय योजनेत समाविष्ट आहेत. सरासरी चार ते दहा हजार लाभार्थी प्रत्येक तालुक्यात आहेत. त्यामुळे शिधापत्रिका असूनही लाखो कुटुंबे साखरेपासून वंचित राहणार आहेत.