नाशिकमध्ये रंगेहाथ पकडलेल्या लाचखोर अभियंत्यांची दिवाळी तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 04:14 PM2017-10-14T16:14:36+5:302017-10-14T17:12:56+5:30

Diwali prisoners caught in dacoity in Nashik, Diwali prisoners | नाशिकमध्ये रंगेहाथ पकडलेल्या लाचखोर अभियंत्यांची दिवाळी तुरुंगात

नाशिकमध्ये रंगेहाथ पकडलेल्या लाचखोर अभियंत्यांची दिवाळी तुरुंगात

Next

नाशिक - रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदाराच्या कामाचे अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण विभाग) कार्यकारी अभियंता देवेंद्र सखाराम पवार, सहायक अभियंता सचिन प्रतापराव पाटील व शाखा अभियंता अजय शरद देशपांडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी रंगेहाथ पकडले होते. त्यांना आज न्यालायात हजर केले असता न्यायालयाने येत्या मंगळवरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

येवला डांबर प्रकल्पाचे मालक मोहिते हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी २८ टक्के कमी दराची निविदा भरली होती. त्यांना कंत्राट मिळाले व त्यांनी कामही पूर्ण केले. कामाचे अंतिम देयक मंजूर करून ठेकेदार मोहितेंना पैसे अदा करण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पवार, पाटील व देशपांडे यांनी सहा लाखांची मागणी केली होती. मोहिते यांनी नाशिकच्या एसीबीकडे तक्रार केली होती.

अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सापळा रचला. तीन अभियंत्यांनी मोहितेंकडे सहा लाख रुपयांची मागणी केली़ त्यापैकी तीन लाख रुपये (दोन लाख रुपयांचे मूळ चलन व १ लाख रुपयांचे नकली चलन ) शाखा अभियंता अजय देशपांडे यांनी तक्रारदाराकडून कार्यालयात स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. देशपांडे यांनी ही रक्कम देवेंद्र पवार व सचिन पाटील यांच्या निर्देशानुसार स्वीकारल्याची कबुली दिली. त्यानंतर पवार व पाटील यांना ताब्यात घेण्यात आले. तिघांच्याही मालमत्तेची चौकशी सुरू होती.

Web Title: Diwali prisoners caught in dacoity in Nashik, Diwali prisoners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक