दिवाळीच्या खरेदीमुळे बाजारात नवचैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:18 AM2019-11-13T00:18:33+5:302019-11-13T00:19:00+5:30
भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सव आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वात धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीजेच्या उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व असून, नाशिककरांनी यावर्षी जल्लोषात दिवाळी साजरी करीत मोठ्या प्रमाणात कपडे, दागिने, गृहोपयोगी वस्तूंसह वाहन व घरे खरेदी केल्याने बाजारपेठेत गेल्या वर्षभरापासून असलेले मंदीचे वातावरण संपूर्णपणे दूर होऊन बाजारात नवचैतन्य संचारल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
नाशिक : भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सव आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वात धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीजेच्या उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व असून, नाशिककरांनी यावर्षी जल्लोषात दिवाळी साजरी करीत मोठ्या प्रमाणात कपडे, दागिने, गृहोपयोगी वस्तूंसह वाहन व घरे खरेदी केल्याने बाजारपेठेत गेल्या वर्षभरापासून असलेले मंदीचे वातावरण संपूर्णपणे दूर होऊन बाजारात नवचैतन्य संचारल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नाशिककरांनी चोख सोन्यासोबतच सोने-चांदीचे दागिने आणि चांदीच्या देवी-देवतांच्या मूर्ती, पूजेची थाळी व इतर मानाच्या व्यक्तींना भेट देण्यासाठी ताट, ग्लास, वाटी आदी भांड्यांची केलेली खरेदी यामुळे सराफ बाजाराने विक्रीचा उच्चांक गाठला. तर लक्ष्मीपूजेच्या मुहूर्तावरही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. दोन्ही दिवसांची मिळून नाशिकमधील बाजारपेठेत सुमारे १०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शहरातील अनेक व्यावसायिकांनी त्यांच्या नवीन व्यवसायाची सुरुवात केली. तर अनेकांनी घराचे स्वप्न साकार करीत आपल्या हक्काच्या नवीन घरात प्रवेश केला. स्थिरस्थावर झालेल्या नाशिककरांनी वाहन खरेदीला प्राधान्य दिले. यात चारचाकी वाहनांचे प्रमाण अधिक असले तरी व्यावसायिक वाहनांचीही ग्राहक ांनी लक्ष्मीपूजेला मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे दिसून आले. शेतकºयांनी ट्रॅक्टर आणि शेतीउपयोगी साधनांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे अनेकांनी गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला प्राधान्य दिले.
दिवाळीच्या उत्साहावर पाणी
शहरात आठवडाभरापासून पावसाच्या वातावरणामुळे दिवाळीच्या खरेदीवर काही प्रमाणात परिणाम झाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने ग्राहकांनी जोरदार खरेदी केली. मात्र ऐन दिवाळीच्या आठवडाभरात सातत्याने ढगाळ वातावरण आणि पावसाच्या संतत सरी यामुळे औद्योगिक वसाहत आणि खासगी आस्थापनाच्या कर्मचाºयांना बोनसच्या स्वरूपात हातात पैसा येऊनही मनाप्रमाणे खरेदी करता न आल्याने त्यांच्या दिवाळीच्या उत्साहावर पाणी फिरल्याचे दिसून आले. अनेक नाशिककरांनी पावसाची आणि कामाची वेळ सांभाळून आपल्या कुटुंबीयांसाठी खरेदी केली.
सुटीमुळे ऐन उत्सवात खरेदी
कामगारवर्गाला शनिवारपासून सुट्या असल्यामुळे अनेकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर घरातील टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची खरेदी केली. अनेकांनी लक्ष्मीपूजेच्या मुहूर्तावर वाहन खरेदी केले असून, अनेकांनी लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचे नियोजन केले होते. मुहूर्तावर चारचाकी वाहनांसोबतच व्यावसायिक वाहनांची खरेदी करणाºया ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, दीपोत्सवात रोज किमान तीनशे ते चारशे दुचाकी वाहनांची विक्री झाली असून, लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या मुहूर्तावर हा आकडा तीन ते साडेतीन हजारांवर पोहोचल्याचे वितरकांनी सांगितले.
सराफ बाजारात गुंतवणूक दारांसह सामान्य ग्राहकांनीही खरेदीसाठी उत्साह दाखविल्याने गेल्या दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी दिवाळीच्या काळात चांगली उलाढाल झाली. सोन्यातून मिळणारा परतावा अन्य कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा अधिक आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी चोख सोने खरेदी करण्यास पसंती दिली.
- चेतन राजापूरकर, अध्यक्ष,
नाशिक सराफ असोसिएशन
नाशिक शहरातील बांधकाम व्यवसायात दिवाळीत ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात एकूण पाचशे फ्लॅटची विक्री झाल्याचा प्राथमिक अंंदाज असून दीपावलीच्या कालावधीत ज्यांनी घरांची चौकशी केली, असे ग्राहक अजूनही घर खरेदीत उत्सुकता दाखवित आहेत. त्यामुळे बांधकाम व्यवसायात आश्वासक वातावरण निर्माण झाले आहे.
- सुनील गवांदे, पदाधिकारी, नरेडको
गेल्या वर्षभराच्या तुलनेत या दिवाळीत परिस्थिती सुधारली आहे. उत्तर महाराष्ट्रातील ग्राहक नाशिकमध्ये घर खरेदीला मोठ्या प्रमाणात उत्सुक असून शहरातील २५ ते ४५ लाख रुपये किमतीच्या घरांना अधिक मागणी आहे. यात रेडीपजेशनसोबतच निर्माणाधीन प्रकल्पांमधील फ्लॅट बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान आवास योजनेची सवलत आणि व्यावसायिकांनी जाहीर केलेल्या विविध सवलतींच्या योजना ग्राहकांना घर खरेदीसाठी प्रोत्साहित केल्याचे दिसून आले.
- उमेश वानखेडे, अध्यक्ष, क्रेडाई, नाशिक