सिडको भागात डीजेमुक्त मिरवणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:52 AM2017-09-07T00:52:53+5:302017-09-07T00:53:03+5:30
सिडको : ‘गणपती बाप्पा मोरया- पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत सिडको व अंबड भागातील सार्वजनिक मंडळांनी तसेच घरघुती गणरायास ढोल-ताशांच्या गजरात गुलालांची उधळण करीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. यंदाच्या वर्षी सिडको व अंबड भागातील गणेश मिरवणुका शंभर टक्के डॉल्बीमुक्त (डी.जे.) झाल्या असून, रात्री साडेबारा वाजेपर्यंत मूर्ती संकलन व गणेश विसर्जन करण्यात आले. सिडको भागात १९ हजार १३६ मूर्तींचे संकलन झाले असून, सुमारे १७ टन निर्माल्य जमा झाल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.

सिडको तसेच अंबड भागात सार्वजनिक मंडळांकडून मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत करण्यात आले.
यंदाच्या वर्षी डॉल्बी (डी.जे.) वाजविण्यास बंदी असल्याने मंडळांकडून ढोल-ताशांचा वापर करीत मिरवणूक काढण्यात आली. शिवगंगा सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ व ओम गुरुदेव मित्रमंडळ या दोन मुख्य मिरवणुका होत्या. याबरोबरच घराघरांतील गणेशमूर्ती दान करण्यात आल्या. सिडको व अंबड भागातील सिडको वसाहत मित्रमंडळ, राजे छत्रपती मित्रमंडळ, श्री साई समर्थ ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ, शिवराज युवक मित्रमंडळ, राजे संभाजी सांस्कृतिक कला व क्रीडा मित्रमंडळ, शिवसाई सामाजिक विकास संस्था, मावळा सामाजिक प्रतिष्ठान वक्रतुंड मित्रमंडळ, सद््भावना युवक मित्रमंडळ, तुळजाभवानी मित्रमंडळ, वंदे मातरम् मित्रमंडळ, खोडे मळा येथील भैरवनाथ मित्रमंडळ, संस्कृती बालगणेश मित्रमंडळ, वृंदावन कॉलनी मित्रमंडळ यांसह अनेक सार्वजनिक मंडळांनी गणरायास भावपूर्ण वातारणात निरोप दिला. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.महापालिकेच्या सिडको विभागातील संभाजी स्टेडिअम (१० हजार ८७८), पवननगर स्टेडिअम ( ४ हजार ३४०), पिंपळगावखांब वालदेवी घाट ( २ हजार ७३), डे केअर शाळा मैदान (१ हजार १५८), जिजाऊ सभागृह, गोविंदनगर (६८७) अशा एकूण १९ हजार १३६ मूर्ती संकलित करण्यात आल्या असून, सुमारे १७ टन निर्माल्य गोळा करण्यात आले.