‘डीजे’ ची मिळाली ‘साथ’ आरोग्याची लागली ‘वाट’

By admin | Published: September 10, 2014 09:51 PM2014-09-10T21:51:31+5:302014-09-11T00:16:32+5:30

‘डीजे’ ची मिळाली ‘साथ’ आरोग्याची लागली ‘वाट’

'DJ's got' with 'health risk' waiting ' | ‘डीजे’ ची मिळाली ‘साथ’ आरोग्याची लागली ‘वाट’

‘डीजे’ ची मिळाली ‘साथ’ आरोग्याची लागली ‘वाट’

Next




नाशिक, दि. १० - श्री गणेश विसर्जनाची मिरवणूक असो की लग्नाची मिरवणूक यामध्ये ताल धरण्यासाठी डीजेची साथ ही अनेकांच्या दृष्टीने मस्ट असते़ मात्र, यामुळे मिरवणूक परिसरातील रहिवाशांचे आरोग्यच धोक्यात येत असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या सर्व्हेक्षणातून समोर आले आहे़ त्यातच साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामुळे घडलेल्या घटनेमुळे डीजेचे दुष्परिणाम समोर आले आहेत़ नाशिकमध्येही मिरवणूक मार्गावर अनेक जुने वाडे असून साताऱ्यासारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ यापुढे सार्वजनिक मंडळांनी मिरवणुकांमध्ये डिजेचा वापर थांबविण्यास नागरिकांच्या आरोग्याबरोबरच न्यायालयाच्या आदेशाचेही पालन होईल असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे़


सातऱ्यातील गणेश विसर्जन मिरवणुक मार्गावर लांजेकर यांचा जुना व धोकेदायक वाडा आहे़ श्री विसर्जन मिरवणुकीत विविध मंडळांनी लावलेले डीजेच्या दणदणाटामुळे अगोदरच धोकेदायक असलेल्या या वाड्याचा सोमवारी रात्री काही भाग कोसळला़ या वाड्याच्या शेजारी वडापाव विक्र ी करणाऱ्या एका गाड्यावर हा भाग कोसळल्याने त्या खाली वडापाव विक्रेता आणि काही ग्राहक गाडले गेले. या वेळी त्यांचा आरडाओरडा काही नागरिक ऐकून मदतीसाठी धावले व गाडले गेलेल्यांना बाहेर काढत असतानाच या वाड्याचा उर्वरीत सर्व भाग कोसळल्याने पुन्हा नव्याने काही जण या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
नाशिक शहराच्या दृष्टीकोनातून या घटनेच्या विचार करता या प्रकारची दुर्घटना नाशिक शहरातही घडू शकते, कारण नाशिक शहरातील मिरवूणक मार्गावरही अनेक जुने व धोकेदायक वाडे आहेत़ महापालिका दरवर्षी पावसाळ्यात या वाड्याच्या मालकांना नोटीसा पाठवून आपले कर्तव्य पार पाडते, मात्र पावसाळा गेला की, वाडेमालक आणि महापालिका या दोघांनाही याचा विसर पडतो़ नाशिक शहरामध्ये विविध महापुरुषांच्या जयंत्या, श्रीगणेश विसर्जन, नवरात्रोत्सव असे वेगवेगळे उपक्रम सार्वजनिक मंडळांकडून साजरे केले जातात़ नाशिकच्या पारंपारीक मार्गावरून या डीजे, ढोल-ताशांच्या गजरात या मिरवूणका काढल्या जातात़ त्यामुळे साताऱ्यासारखी घटना नाशिकमध्ये घडल्यास नवल वाटण्याचे कारण नाही़
गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेचा दणदणाट, त्यासोबत केला जाणारा हिडीस नाच, जल्लोष करताना मोठ्या प्रमाणात उधळला जाणारा गुलाल, त्यामुळे अनेकांच्या डोळ्यांना होणारी इजा, त्यातून उद्भवणारे तणावपूर्ण प्रसंग, छेडछाडीचे प्रयत्न या प्रकारांमुळे सार्वजनिक मिरवणूका या टिकेच्या लक्ष्य बनत चालल्या आहेत़ त्यातच नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार ज्या मार्गाने या मिरवणूका निघतात तेथे होणाऱ्या ध्वनीप्रदुषणामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे़
सार्वजनिक कार्यक्रम साजरे करणाऱ्या मंडळांनी शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे़ सार्वजनिक मंडळांनी यापुढे मिरवणुकीत डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांच्या तालावर काढाव्यात असे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे़

‘डीजे’ म्हणजे काय?
सार्वजनिक वा वैयक्तिक स्वरुपातील आनंदाच्या क्षणी नागरिकांच्या मागणीनुसार त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी पैसे देऊन इलेक्ट्रॉनिक साऊंड सिस्टिम मिक्सरवरून लोकप्रिय गाणी वा गिते मोठ्या आवाजाच्या क्षमतेच्या स्पिकरवर लावून एकविणाऱ्या व्यक्तीला डीजे असे म्हणतात़ साधारणत: वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या डिजेंचे तीन प्रकार पडतात़
ल्लरेडिओ डीजे, ल्लक्लब आणि पब डीजे ल्लमोबाईल डीजे

‘डीजे’ च्या आवाजामुळे कोसळला वाडा
श्री गणेश् विसर्जन मिरवणुकीत लावलेल्या डॉल्बीच्या दणदणाटाने साताऱ्यात वाडा कोसळला. या दुर्घटनेत तिघांचा मूत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघाताबाबत पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले असून, या घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
साताऱ्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मिरवणूक सोमवारी दुपारी चार वाजता सुरू झाली. शहरातील राजपथावरून जाणाऱ्या या मिरवणुकीत अनेक मंडळांनी डॉल्बी चा दणदणाट उडवून दिला होता. या दणदणाटामुळे अगोदरच धोकादायक बनलेल्या लांजेकर वाड्याचा काही भाग सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कोसळला. या वाड्याच्या शेजारी वडापाव विक्र ी करणाऱ्या एका गाड्यावर हा भाग कोसळल्याने त्या खाली वडापाव विक्रेता आणि काही ग्राहक गाडले गेले. या वेळी त्यांचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी काही नागरिक धावले.
या दुर्घटनेत गाडले गेलेल्यांना बाहेर काढत असतानाच या वाड्याचा उर्वरीत सर्व भाग कोसळल्याने पुन्हा नव्याने काही जण या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. विशेष म्हणजे ही घटना घडली त्या वेळी घटनास्थळावरील वीजपुरवठा खंडित होता. सर्वत्र अंधार आणि सुरू असलेल्या डॉल्बी च्या दणदणाटामुळे एकच गोंधळ उडाला होता़
या घटनेत उमाकांत गजानन कुलकर्णी(राग़ोपाळ पेठ ,सातारा), गजानन श्रीरंग कदम (रा़बाबर कॉलनी, करंजे), चंद्रकात भिवा बोले (रा. समर्थ मंदिर, सातारा ) या तिघांचा मृतांमध्ये समावेश असून सात जण गंभीर जखमी झाले.

ध्वनी नियमन आणि नियंत्रण कायदा़़़
श्री गणेशउत्सव आणि इतर उत्सवांमध्ये ध्वनी (नियमन आणि नियंत्रण) नियमातील तरतुदींप्रमाणे त्या-त्या भागातील वातावरणातील (औद्योगिक, रहिवासी, व्यवसायिक आणि शांतता) ध्वनीसाठी दिलेल्या मानकांचे दिवसा आणि रात्री उल्लंघन होणार नाही, अशा पद्धतीने ध्वनीक्षेपक व इतर वाद्ये यांचा आवाज समिती ठेवावा़ विशेषत: शांतता क्षेत्रामध्ये दिवसा ५० डेसीबलपेक्षा जास्त आणि रात्री ४० डेसीबलपेक्षा जास्त, रहिवासी परिसरात दिवसा ५५ डेसिबलपेक्षा जास्त व रात्री ४५ डेसिबलच्या पुढे वातावरणातील ध्वनींची पातळी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी़ तसेच १० नंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे , राज्य शासनाने जाहीर केलेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त दिव कोणतही ध्वनीप्रदूषण करणारी व शांतता भंग करणारी कृती करू नये़

Web Title: 'DJ's got' with 'health risk' waiting '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.