प्रकाश आमटे यांना आरोग्य विद्यापीठाची डी.लिट

By admin | Published: November 7, 2016 11:33 PM2016-11-07T23:33:19+5:302016-11-08T00:41:26+5:30

प्रकाश आमटे यांना आरोग्य विद्यापीठाची डी.लिट

D.Lit of Health University, Prakash Amte | प्रकाश आमटे यांना आरोग्य विद्यापीठाची डी.लिट

प्रकाश आमटे यांना आरोग्य विद्यापीठाची डी.लिट

Next

नाशिक : समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना आरोग्य विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर आॅफ लिटरेचर (डी.लिट) या पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अधिसभेत घेण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या मुख्यालयात कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिसभा सभेत आमटे यांना डी.लिट पादवी देण्याचा ठराव संमत करण्यात आला. डॉ. आमटे यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे यांचादेखील यावेळी सन्मान केला जाणार आहे. डॉ. आमटे दाम्पत्यांनी गडचिरोलीतील हेमलकसा या दुर्गम भागात तेथील आदिवासींसाठी रुग्णसेवा देत आहेत. लोक बिरादरी या प्रकल्पाच्या माध्यमातून आमटे यांनी आदिवासी लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठीदेखील भरीव कार्य केले असून, त्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत आरोग्य विद्यापीठाने त्यांना डी.लिट पदवी देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतल्याचे कुलगुरू म्हैसेकर यांनी सांगितले. (पान ७ वर)
प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सुचविल्यानुसार आमटे यांना पदवी बहाल करण्याचा प्रस्ताव कुलपती कार्यालय व व्यवस्थापन परिषदेने समंत केल्यानंतर अधिसभेत या संदर्भात ठराव करण्यात आला. दरम्यान, यापूर्वी विद्यापीठातर्फे २००७ मध्ये पद्मभूषण डॉ. एल. एच. हिरानंदानी, २००८ मध्ये डॉ. अनिल कोहली, तर २०१५ मध्ये डॉ. सायरस पुनावाला यांना डी.लिट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title: D.Lit of Health University, Prakash Amte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.