डोंगरगावला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:56 PM2018-08-12T23:56:04+5:302018-08-13T00:30:04+5:30

देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील राम मंदिरात शनिवारपासून (दि. ११) ज्ञानेश्वरी पारायण आणि भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहास प्रारंभ झाला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र म आयोजित करण्यात आले आहेत.

Dnyanagaragala Dnyaneshwari Parayan Sohala | डोंगरगावला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

डोंगरगावला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

googlenewsNext

मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील राम मंदिरात शनिवारपासून (दि. ११) ज्ञानेश्वरी पारायण आणि भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहास प्रारंभ झाला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र म आयोजित करण्यात आले आहेत.
रोज पहाटे काकड भजन, सकाळी आणि दुपारी ग्रंथ पठण, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री ९ ते ११ यावेळेत एकनाथ महाराज सदगीर ठाणेकर हे भागवत कथेवर प्रवचन देत आहे.
रोषणाईने मंदिर
परिसर झळाळून निघाला
आहे. यावर्षी पहिल्यांदाच सप्ताह काळात रात्री कीर्तनाऐवजी भागवत
कथा आयोजित केली
आहे.
देवळा तालुक्यातील डोंगरगाव हे वै. कृष्णाजी माउली यांच्या कृपेने वारकरी संप्रदायाचे गाव म्हणून ओळखले जाते. सप्ताहाच्या सहाव्या दिवशी दुपारी पालखी सोहळा होणार आहे.
अखेरच्या दिवशी सकाळी एकनाथ महाराज सदगीर यांचे काल्याचे कीर्तन होईल. महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे. भागवत कथा ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

Web Title: Dnyanagaragala Dnyaneshwari Parayan Sohala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.