वंजारवाडीच्या सरपंचपदी ज्ञानेश्वर शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 06:48 PM2021-02-15T18:48:03+5:302021-02-15T18:52:09+5:30
नांदुरवैद्य : नाशिक तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वंजारवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पहिलवान ज्ञानेश्वर शिंदे तर उपसरपंचपदी बाळू लोहरे यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली.
नांदुरवैद्य : नाशिक तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वंजारवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पहिलवान ज्ञानेश्वर शिंदे तर उपसरपंचपदी बाळू लोहरे यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली.
आरक्षण घोषित झाल्यानंतर सर्वांनाच या निवडीची उत्सुकता लागलेली होती. आरक्षण पद्धतीनुसार सर्वसाधारण पुरुष खुल्या प्रवर्गानुसार सरपंचपदी ज्ञानेश्वर शिंदे यांची वर्णी लागली असल्याने ग्रामस्थांनी जल्लोषात या निवडीचे स्वागत केले आहे.
वंजारवाडी येथील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या निवडणुकीत यावर्षी एकूण नऊ सदस्य निवडून आले असून आरक्षण घोषित झाल्यानंतर या ठिकाणी सरपंचपदासाठी सर्वसाधारण पुरुष खुला प्रवर्ग या जागेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. याप्रमाणे सोमवारी (दि.१५) निवडणूक निर्णय अधिकारी विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ग्रामविकास अधिकारी योगेश पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या निवडणुकीत सरपंचपदासाठी ज्ञानेश्वर रामदास शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे सरपंचपदी ज्ञानेश्वर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंचपदी बाळू लोहरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजय चौधरी यांनी काम पाहिले.
याप्रसंगी ग्राम विकास अधिकारी योगेश पगार, विजय चौधरी, भाऊसाहेब शिंदे, कैलास शिंदे, विलास शिंदे, नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, योगेश शिंदे, खंडू शिंदे, किसन लोहरे, अशोक मुसळे, गणपत लोहरे, जयराम शिंदे, चंद्रभान शिंदे, किसन शिंदे, राजाराम परदेशी, विजय परदेशी, भगवान शिंदे, कारभारी शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
(१५ वंजारवाडी)
वंजारवाडी येथे पार पडलेल्या निवडणुकीत निवड झालेल्या नवनिर्वाचित सरपंच ज्ञानेश्वर शिंदे व उपसरपंच बाळू लोहरे यांचा सत्कार करतांना ग्रामस्थ.