सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर 4 लाखांची लाच घेणाऱ्या ज्ञानेश्वर विसपुतेला कोठडीची हवा
By अझहर शेख | Published: September 18, 2023 04:12 PM2023-09-18T16:12:16+5:302023-09-18T16:13:08+5:30
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी या शासकिय योजनेअंतर्गत पातोंडा येथे समूह परिसरात क्लस्टर तक्रारदाराकडून विकसित करण्यात आले आहे.
नाशिक : चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील क्लस्टर विकासाचे परिक्षण करत पुर्णत्वाचा दाखला दिला. याकामाची बिलाची रक्कम तक्रारदाराला मिळाली. यामुळे त्या मोबदल्यात बक्षीस म्हणून व अनामत रक्कम ३५ लाख रुपये तक्रारदारास मिळवून देण्याच्या मोबदल्यात ५ कोटींची लाचेची मागणी जिल्हा परिषदेो उप विभागीय अभियंता संशयित ज्ञानेश्वर विसपुते यांनी केली होती. तडजोडअंती चार लाख रूपये लाचेची रक्कम घेताना विसपुते रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी या शासकिय योजनेअंतर्गत पातोंडा येथे समूह परिसरात क्लस्टर तक्रारदाराकडून विकसित करण्यात आले आहे. या कामाचे परिवेक्षण करत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत उपविभागीय अभियंता ज्ञानेश्वर विसपुते (५७,रा.शुभस्तू बंगला, अशोकनगर, धुळे) यांनी तक्रारदाराकडे पाच लाखांची लाच मागितली होती. शनिवारी (दि.१६) विसपुते हे एका कार्यक्रमासाठी नाशिकला आले असता त्यांनी तक्रारदाराकडून तडजोडअंती ४ लाखांची रक्कम रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास गडकरी चौकात स्वीकारली. यावेळी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याविरूद्ध मुंबईनाका पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची येत्या बुधवारपर्यंत (दि.२०) पोलीस कोठडी सुनावली आहे. विसपुते हे पुढील काही महिन्यानंतर शासकिय सेवेतून सेवानिवृत्त होणार होते. जाता-जाता चार लाखांची लाच घेणे त्यांच्या अंगलट आले असून आता कोठडीची हवा त्यांना खाऊ लागत आहे.
म्हणे, बिलाच्या मोबदल्यात १ टक्का दे...!
क्लस्टर कामाचे परिवेक्षण करत पुर्णत्वाचा दाखला दिल्यामुळे तक्रारदाराला ४ कोटी ८२ लाख रुपये रक्कम मिळाली. तसेच अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ३५ लाख रुपयेदेखील तक्रारदाराला मिळवून देण्याचे आश्वासन देत १ टक्क्याने ५ लाख रूपये संशयित विसपुते यांनी मागितले होते, असे तपासात पुढे आले आहे. त्यांनी तडजोडअंती ४ लाख रूपयांची लाच स्वीकारली. एका नातेवाईकाच्या घरी कार्यक्रमासाठी नाशिकला आल्यानंतर पुन्हा तक्रारदाराला संपर्क साधून त्यांनी लाचेची मागणी केली. यावेळी गडकरी चौकातील सिग्नलजवळ रोकड घेऊन बोलावले व पंचांसमक्ष ती स्वीकारली असता पथकाने जाळ्यात घेतले.