जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे ज्ञानेश्वरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:16 AM2021-09-27T04:16:35+5:302021-09-27T04:16:35+5:30
श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन, यज्ञ प्रकल्प आणि स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठ, पतंजली योग समिती यांच्यातर्फे सिडकोतील त्रिमूर्ती ...
श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन, यज्ञ प्रकल्प आणि स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठ, पतंजली योग समिती यांच्यातर्फे सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथील बाबूराव मटाले गार्डन येथे रविवारी श्री ज्ञानेश्वरी जयंती सोहळा घेण्यात आला. त्याप्रसंगी गुट्टे महाराज बोलत होते. शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, नगरसेविका भाग्यश्री ढोमसे, योगाचार्य डॉ. प्रज्ञा पाटील, पंडित गुरुजी, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. महाराज म्हणाले, संत ज्ञानेश्वरांनी १४व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिण्यास प्रारंभ केला, तर १६ व्या वर्षी ती पूर्ण केली. प्रत्येकाने जीवनात ज्ञानेश्वरी अनुभवावी, असे आवाहन डॉ. गुट्टे महाराज यांनी केले. यावेळी बडगुजर, योगाचार्य डॉ. प्रज्ञा पाटील, भाग्यश्री ढोमसे यांनी मनोगत व्यक्त केले. या ठिकाणी रोज पहाटे ५.३० ते ७ या वेळेत रामनाथ गंभिरे आणि सुभाष वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली योगवर्गदेखील घेतले जातात. विजय सोनवणे यांनी सूत्रसंचालन आणि बालासाहेब शेळके यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमास शिवाजी चौधरी, गोकुळ नागरे, मधुकर गायकवाड, पवन मटाले, श्याम पिम्परकर, संपत कुटे यांच्यासह भाविक उपास्थित होते.