ज्ञानेश्वरी सप्ताहानिमित्त ग्रंथदिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 02:31 PM2019-03-23T14:31:59+5:302019-03-23T14:32:05+5:30
नामपूर : येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह निमित्ताने ग्रंथ दिंडी सोहळा मिरवणूक काढण्यात आली यात शेकडो महिलांनी सहभाग घेतला. महिलांनी डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवून टाळ-मृदुंगाच्या घोषात नगर प्रदक्षिणा करून ग्रंथिदंडी काढण्यात आली.
नामपूर : येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह निमित्ताने ग्रंथ दिंडी सोहळा मिरवणूक काढण्यात आली यात शेकडो महिलांनी सहभाग घेतला. महिलांनी डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवून टाळ-मृदुंगाच्या घोषात नगर प्रदक्षिणा करून ग्रंथिदंडी काढण्यात आली. नामपूर शहरात गेल्या ३७ वर्षापासून सुरू असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा परंपरा या वर्षीही दिमाखात साजरा करण्यात आला. आठ दिवसाचा ज्ञानेश्वरी सप्ताहात भजन, कीर्तन, अखंड हरिनामाने साजरा करण्यात येतो. यावर्षीही मोठ्या उत्साहात ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह साजरा करण्यात आला. संत कृष्णाजी माऊली श्रीक्षेत्र जायखेडा यांच्या आशीर्वादाने यशोदा आक्का जायखेडा यांच्या मार्गदर्शनाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह आयोजित करण्यात येतो. या सप्ताहात आठ दिवस नामांकित कीर्तनकारांची कीर्तने प्रवचने होतात रोज नित्यनेमाने हरिपाठ काकडा भजन होते. या सप्ताहात शेकडो महिला व पुरु षांनी सहभाग घेऊन ज्ञानेश्वरी ग्रंंथाचे वाचन करून पारायण केले. काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता करण्यात आली. दहीहंडी बनवून यातील काला भाविकांना वाटण्यात आला व महाप्रसादाने कार्यक्र माची सांगता करण्यात आली. कार्यक्र मासाठी आण्णा सावंत,अशोक सावंत,बाजीराव सावंत,विनोद खैरनार,उदय पगारे, निलेश सावंत, शरद खैरनार, दिपक खैरनार,अशोक सूर्यवंशी, भालचंद्र वाघ,मोहन शिरापुरी, योगेश वाघ, चंद्रकांत सावंत,सुधाकर मोरे, शशिकांत बच्छाव,दीपक बच्छाव,दिगंबर सोनवणे, तूकेश निकम,दिनानाथ महाराज सावंत,राकेश महाराज धोंडगे,विनोद सावंत,जगदीश शेठ सावंत, महेश सावंत,विनय सावंत,दादा वाणी,कैलास चौधरी,ओंकार बच्छाव मुरलीधर खैरनार वसंत पवार केदा निकम शिवाजी सावंत उपस्थित होते.