दररोज घरच्या घरी करा, सहा मिनिटे वॉक टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:15 AM2021-04-27T04:15:14+5:302021-04-27T04:15:14+5:30

शहरात केारोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या चिंतेचे वातावरण आहे. सध्या कोरोनामुळे वातावरण इतके कठीण हाेत आहे. ...

Do it at home every day, six minutes walk test | दररोज घरच्या घरी करा, सहा मिनिटे वॉक टेस्ट

दररोज घरच्या घरी करा, सहा मिनिटे वॉक टेस्ट

Next

शहरात केारोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या चिंतेचे वातावरण आहे. सध्या कोरोनामुळे वातावरण इतके कठीण हाेत आहे. सामान्य सर्दी खेाकला, ताप अशा प्रकारचे आजार असेल, तर अशा वेळी त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. अशा वेळी समजा ऑक्सिजनची पातळी तपासायची असेल, तर तत्काळ वॉक टेस्ट करता येईल. किमान सहा मिनिटे घरातल्या घरात जोरात चालून बघितल्यांनतर ऑक्सिमीटरमध्ये तपासणी करायची. त्यात ९४-९५ची पातळी चालल्यानंतर ८८ पर्यंत आली, तर समजावे की हा संसर्ग असू शकतो. त्यानंतर, तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेऊन पुढील उपचार घेता येऊ शकतील.

इन्फो..

असे लागणार साहित्य

घड्याळ, पल्स, ऑक्सिमीटर

इन्फो...

कोणी करायची ही टेस्ट

सर्दी, खेाकला, ताप अशी कोरोनाची लक्षणे असतील, तर वॉक टेस्ट अवश्य करावी आणि गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांनी तर ही चाचणी राेज करावी.

इन्फो..

अशी करा चाचणी

आपल्या बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावर दिसणाऱ्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीची नोंद करावी. नंतर पल्स ऑक्सिमीटर बोटाला तसेच ठेवून घरातल्या घरात घड्याळ लावून सहा मिनिटे स्थिर गतीने वॉक करावा. नंतर पुन्हा ऑक्सिमीटरवरील नोंद घ्यावी.

इन्फो..

तर घ्या काळजी.

सहा मिनिटे चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९३ पेक्षा कमी झाली तर..

चालणे सुरू करण्यापूर्वीच्या पातळीपेक्षा चालणे झाल्यानंतर ही पातळी तीनपेक्षा अधिकने कमी झाली तर ...

चालल्यानंतर धाप लागणे, दम लागल्यासारखे होत असेल तर... तातडीने डॉक्टरांना दाखवावे.

कोट...

एरवी सामान्य वाटणारा, सर्दी, खोकला किंवा वातावरण बदलामुळे येणारा ताप आता मात्र काेरोनाचे लक्षण ठरू शकतो. त्यामुळे अशा वेळी वॉक टेस्ट आवश्य करावी, ऑक्सिजनची पातळी ८८ पर्यंत आली की, तातडीने तज्ज्ञ डाॅक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घेतला पाहिजे.

- डॉ.शिरीष देशपांडे

Web Title: Do it at home every day, six minutes walk test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.