नाशिकमध्ये डान्सबारला परवानगी देऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:46 AM2019-01-21T00:46:51+5:302019-01-21T00:47:33+5:30

तरुण पिढी व अनेकांच्या संसाराचा विचार करता नाशकात डान्सबारला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 Do not allow dance bars in Nashik | नाशिकमध्ये डान्सबारला परवानगी देऊ नये

नाशिकमध्ये डान्सबारला परवानगी देऊ नये

Next

नाशिक : तरुण पिढी व अनेकांच्या संसाराचा विचार करता नाशकात डान्सबारला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  निवेदनात म्हटले आहे की, आघाडी सरकारच्या काळात १३ वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्सबारवर बंदी आणली होती. डान्सबारमुळे तरुण पिढीचे भविष्य धोक्यात आले, तसेच डान्सबारमध्ये पैसा उधळण्यासाठी तरुण गुन्हेगारीच्या व अवैध धंद्यांच्या आहारी गेले होते. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली.
या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्रात डान्सबारवर बंदी घालण्याचा कायदा केला, परंतु युती सरकारने न्यायालयात विरोध प्रखरपणे न मांडल्यामुळे सरकारची बाजू कमकुवत राहिली, परिणामी महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबार सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्रात दुष्काळ असल्याने शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगारांपुढे रोजंदारीचा प्रश्न असल्याने अनेक तरुण मुले रोजंदारीसाठी या जाळ्यात अडकून आपले आयुष्य बर्बाद करण्याची शक्यता आहे. नाशिकमधील तरुण पिढीचे भविष्य उद्ध्वस्त होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था टिकावी यासाठी डान्सबारला परवनागी देऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी अ‍ॅड. चिन्मय गाढे, नीलेश सानप, डॉ. संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, सागर बेदरकर, सुनील घुगे, नदीम शेख, मितेश राठोड, संतोष पुंड आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात दुष्काळ असल्याने शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगारांपुढे रोजंदारीचा प्रश्न असल्याने अनेक तरुण मुले रोजंदारीसाठी या जाळ्यात अडकून आपले आयुष्य बर्बाद करण्याची शक्यता आहे. नाशिकमधील तरुण पिढीचे भविष्य उद्ध्वस्त होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था टिकावी यासाठी डान्सबारला परवनागी देऊ नये.

Web Title:  Do not allow dance bars in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.