फोडा दहीहंडी, नका करू वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:51 AM2018-09-04T00:51:50+5:302018-09-04T00:52:05+5:30
जीबीएस अर्थात गोसावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वाहतूक प्रबोधनपर दहीहंडी सण साजरी करण्यात आला. यात वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात संस्थेच्या या प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी वाहतुकीसंदर्भात फलक दर्शवून यंदाची दहीहंडी ही कुठलाही अमाप खर्च न करता साजरी केली.
नाशिक : जीबीएस अर्थात गोसावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वाहतूक प्रबोधनपर दहीहंडी सण साजरी करण्यात आला. यात वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात संस्थेच्या या प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी वाहतुकीसंदर्भात फलक दर्शवून यंदाची दहीहंडी ही कुठलाही अमाप खर्च न करता साजरी केली.
यात रस्त्यावर जेव्हा मोठमोठी मंडळी मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे नियोजन बिघडते व वाहतुकीची कोंडी होऊन शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. रुग्णवाहिकांना अडथळादेखील निर्माण होऊन रु ग्णांचे अतोनात हाल होतात. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन गोसावी बहुउद्देशीय संस्थेच्या मस्ती की पाठशाला प्रकल्पातील चिमुकल्यांनी जणू नागरिकांना वाहतूक प्रबोधनपर एक चांगला संदेश दिला आहे. यामध्ये हंडी फोडणाऱ्या गोविंदाला सेफ्टीगार्ड्स व अपघात टाळा हेल्मेट घाला असे वाहतुकीच्या नियमांचे फलक दर्शविले अशाप्रकारे यंदाचा गोविंदा साजरा करण्यात आला. मुलांना गोपाळकाला म्हणून संस्कार चिठ्ठीचा काला तयार करण्यात आला. त्या चिठ्ठीवरती परिसर स्वच्छ राखणे, दररोज शाळेत जाणे, सन्मान करणे अशी चिठ्ठी गोकुळाष्टमीचा प्रसाद म्हणून मुलांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात कायमस्वरूपी अंमलात आणावे, अशी संकल्पना राबविण्यात आली. दहीहंडी महोत्सवात आडगाव वाहतूक पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक रमेश काशीद, संस्थेचे अध्यक्ष सुनीता गोसावी, सचिव विनोद गोसावी, स्वयंसेवक तुषार धुमाळ, धनश्री गिरी, प्रतिभा वाघ, गौतमी पवार, स्नेहलता सोनावणे, शुभम पगारे उपस्थित होते.
गोसावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वाहतूक प्रबोधनपर दहीहंडी सण साजरी करण्यात आला.
वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात संस्थेच्या या प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी वाहतुकीसंदर्भात फलक दर्शवून यंदाची दहीहंडी ही कुठलाही अमाप खर्च न करता साजरी केली.