झेडपीचा निधी वळवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:56 AM2017-11-07T00:56:55+5:302017-11-07T00:57:01+5:30
जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडील २७०२ लेखाशीर्षांतर्गत आदिवासी उपयोजनेतील जिल्हा परिषदेला मंजूर असलेला निधी अन्य विभागांकडे वळवू नये, या मागणीचे निवेदन सोमवारी (दि. ६) जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडील २७०२ लेखाशीर्षांतर्गत आदिवासी उपयोजनेतील जिल्हा परिषदेला मंजूर असलेला निधी अन्य विभागांकडे वळवू नये, या मागणीचे निवेदन सोमवारी (दि. ६) जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्यासह उपाध्यक्ष नयना गावित, सभापती सुनीता चारोस्कर, गटनेते माजी आमदार धनराज महाले, उदय जाधव यांच्यासह सर्वपक्षीय सदस्यांचे शिष्टमंडळ सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना भेटले. जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे पश्चिम विभागाकडील सन २०१७-१८ या वर्षासाठी ० ते १०० हेक्टर क्षमतेच्या आतील कामांसाठी सुमारे १७ कोटींहून अधिकचा निधी मंजूर करण्यात आला; मात्र जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडे सीमेंट प्लग बंधाºयांसाठी जागा (साइट) नसल्याचे कारण देत हा निधी स्थानिक स्तर विभागाकडे वळविण्याबाबत यापूर्वी जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना सूचना दिल्या आहेत. तोे धागा पकडत जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्यांचे शिष्टमंडळ सोमवारी जिल्हाधिकाºयांना भेटले. हा निधी जिल्हा परिषदेच्या हक्काचा असून, तो वळविल्यास आदिवासी सदस्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे तो निधी वळवू नये, असे या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना सांगितले. त्यावेळी, पुढील आठवड्यात यासंदर्भात एकत्रित बैठक घेऊन जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन यासंदर्भात निर्णय घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले. यावेळी सदस्यांमध्ये दीपक शिरसाट, बाळासाहेब क्षीरसागर, कावजी ठाकरे, यशवंत ढिकले, सुरेश कमानकर यांच्यासह विनायक माळेकर, बाळू गोतरणे, श्याम गावित आदी उपस्थित होते.
झेरॉक्स बाजूला थांबा
जिल्हाधिकाºयांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात काही पदाधिकाºयांचे पतीराज आणि महिला सदस्यांचे पती होते. याबाबत जिल्हाधिकाºयांना आपल्याला निवेदन देण्यासाठी फक्त सदस्यांनीच यावे, कोणी महिला सदस्यांचे पती किंवा पिता असल्यास बाजूला थांबावे, अशा सूचना देताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.