रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:24 AM2018-04-17T01:24:44+5:302018-04-17T01:24:44+5:30
वापरातील बदल तसेच अग्निसुरक्षा नियमानुसार नसणाऱ्या रुग्णालयांना नियमितीकरणासाठी दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर जे या नियमावलीत बसत नाहीत अशांविरुद्ध कारवाई करण्याची तयारी महापालिकेने आरंभली आहे. या रुग्णालयांना अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या असून, रुग्ण दाखल करून घेऊ नये अशाप्रकारे त्यात नमूद करण्यात आले आहे.
नाशिक : वापरातील बदल तसेच अग्निसुरक्षा नियमानुसार नसणाऱ्या रुग्णालयांना नियमितीकरणासाठी दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर जे या नियमावलीत बसत नाहीत अशांविरुद्ध कारवाई करण्याची तयारी महापालिकेने आरंभली आहे. या रुग्णालयांना अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या असून, रुग्ण दाखल करून घेऊ नये अशाप्रकारे त्यात नमूद करण्यात आले आहे. महापालिकेने सर्व संबंधित रुग्णालयांना नोटीस देण्यासाठी ३१ मार्चपर्यंत नूतनीकरण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार नियमितीकरण करून न घेणाºया रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार असून, शहरातील ३४७ रु ग्णालयांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई शुश्रूषागृह अधिनियम १८४९चे सुधारित नियम २००६ नुसार रु ग्णालयाचे नूतनीकरण केले नसल्याने संबंधित रु ग्णालयात रुग्ण दाखल करून घेऊ नये, असे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.महापालिका क्षेत्रात एकूण ६५४ रु ग्णालये असून, त्यात रु ग्णालयांसह प्रसूतिगृहांचाही समावेश आहे. या रु ग्णालयांना मुंबई शुश्रूषागृहअधिनियमानुसार महापालिका क्षेत्रात वैद्यकीय विभागाकडे नोंदणी तसेच नूतनीकरून करून घेणे आवश्यक आहे. मात्र कोलकाता येथील एका अग्निदुर्घटनेनंतर शासनाने नियम तयार केले आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने या सर्व रु ग्णालयांना ३१ मार्चच्या आत नोंदणी व नूतनीकरण करून घेणे सक्तीचे केले आहे. परंतु पूर्वलक्षी पद्धतीने कायद्याची अंमलबजावणीने अडचणीत येत असून, त्यांना शिथिलता असून, जुन्या रु ग्णालयांच्या नूतनीकरणात अग्निशामक दलाच्या ना हरकत प्रमाणपत्राची अडचण येत असल्याची तक्र ार आयएमए, निमा तसेच अन्य वैद्यकीय संघटनांकडून केली जात आहे.
दाखल्याअभावी रखडले नूतनीकरण
शहरातील एकूण ६५४ पैकी २३८ रु ग्णालयांनी नूतनीकरण केले आहे. तर ७० रुग्णालयांचे नूतनीकरण प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या दाखल्याअभावी रखडले आहे. अजूनही ३४७ रु ग्णालयांनी नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे वैद्यकीय विभागाने या सर्व रुग्णालयांना अंतिम नोटिसा पाठविल्या आहेत.