ग्रामपंचायतींचे राजकीय आखाडे करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:35 PM2018-10-21T23:35:56+5:302018-10-21T23:36:31+5:30
नाशिक : देशातील ग्रामपंचायती म्हणजे ग्रामीण विकासाची केंद्रे आहेत. त्यांचे राजकीय आखाडे करू नका, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (दि. २१) महाराष्ट्र सरपंच संसदेत केले.
नाशिक : देशातील ग्रामपंचायती म्हणजे ग्रामीण विकासाची केंद्रे आहेत. त्यांचे राजकीय आखाडे करू नका, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (दि. २१) महाराष्ट्र सरपंच संसदेत केले.
नाशिक येथील चोपडा लॉन्समध्ये नाशिक लोकसभा मतदार संघ व एमआयटी आॅफ गव्हर्नमेंट यांच्या ग्रामोन्नीतीतून देशोन्नती संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र सरपंच परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आदर्श गाव योजनेचे कार्यकारी संचालक पोपट पवार, एमआयटी स्कूलचे संचालक राहुल कराड, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र दराडे, एमव्हीएसटीएफच्या संचालिका श्वेता शालिनी, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, शहराध्यक्ष सचिन मराठे, महेश बडवे आदी उपस्थित होते.
संजय राऊत म्हणाले, प्रशिक्षित सरपंच असतील तरच आदर्श गावांची निर्मिती होऊ शकेल आणि आदर्श गाव स्पर्धा यासारख्या स्पर्धांची गरज उरणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायती राजकारणाचे आखाडे न होता ग्रामीण विकासाची केंद्रे बनली पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सहकार खात्यात विकासात्मक कामाचे नियोजन करण्यापेक्षा अनेक नकारात्मक गोष्टी असल्याने आपण विनंती करून सहकार खात्यापासून स्वत:ची मुक्तता करून घेतल्याचा गौप्यस्फोट करतानाच पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखविल्यामुळे पुन्हा आपल्याला ग्रामविकास राज्यमंत्रिपद मिळाल्याचे दादा भुसे यांनी यावेळी बोलताना सांगितले. महाराष्टÑात २०० गावे दुष्काळी यंदा गत शंभर वर्षांतील सर्वात भीषण दुष्काळ राहणार असल्याचे सांगतानाच देशातील १४ राज्यांमधील ३४० जिल्ह्णांमध्ये पाण्याचा संघर्ष पेटला आहे. महाराष्ट्रातही दोनशे गावांमध्ये भीषण दुष्काळाचे सावट असून, आत्तापासून पाण्याचे नियोजन करावे लागेल. आगामी काळात जगासमोर पिण्याच्या पाण्यासोबतच शेती सिंचन व जनावरांच्या पाण्याचा सर्वांत मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत आदर्श गाव योजनेचे कार्यकारी संचालक पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.वनविभागाच्या जागा हस्तांतरितराज्यातील दुष्काळी परिस्थिच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याच्या उपाययोजना करण्यासाठी वनविभागाच्या परिसरातील एक हेक्टरपर्यंतच्या जागा ग्रामपंचायतींना हस्तांतरित करण्याच्या सूचना वनविभागांना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांत संबंधित भूखंड ग्रामपंचायतींच्या नावावर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.