आश्रमशाळेत न राहणाऱ्या शिक्षकांना पगार देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:20 AM2021-09-08T04:20:02+5:302021-09-08T04:20:02+5:30
चौकट- या आहेत शासनाच्या सूचना सर्व शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेच्या आवारामध्ये राहणे बंधनकारक ...
चौकट-
या आहेत शासनाच्या सूचना
सर्व शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेच्या आवारामध्ये राहणे बंधनकारक आहे. ज्या आश्रमशाळेत पुरेसी निवासस्थाने नाहीत, तर संबंधितांनी त्या गावामध्ये राहणे बंधनकारक आहे.
ज्यांना मुख्यालयी राहणे शक्य नाही, त्यांनी समर्थनीय कारण देऊन निश्चित काळासाठी अपर आयुक्तांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.
जेथे राहण्याची सोय नाही, अशा शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळा आवारात किती लोकांची सोय आहे व किती लोक आवाराबाहेर राहतील याचा तपशील अपर आयुक्तांना द्यावा आणि त्यांच्या लेखी आदेशानंतर संबंधितांना परवानगी द्यावी. शक्यतो वरिष्ठ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिसरात राहणे बंधनकारक राहील.
ज्या प्रकल्प कार्यालय क्षेत्रातील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी येतील, त्याबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.