विद्युत जोडणीशी खेळ नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:00 AM2017-10-18T00:00:34+5:302017-10-18T00:12:44+5:30

दिवाळी अर्थात प्रकाशाचा उत्सव त्यामुळे घरे, दुकाने आणि परिसर सर्वत्र झगमगाट आलाच. मात्र हा झगमगाट करताना विद्युत रोषणाईचा आधार प्रत्येकाकडून घेतला जातो, त्याशिवाय झगमगाट अपूर्णच राहतो. त्यामुळे प्रत्येकाने रोषणाईची सजावट करताना खबरदारी घेणेही तितकेच गरजेचे आहे, अन्यथा लहान चूकही महागात पडू शकते.

 Do not play games with power connectivity! | विद्युत जोडणीशी खेळ नको !

विद्युत जोडणीशी खेळ नको !

googlenewsNext

नाशिक : दिवाळी अर्थात प्रकाशाचा उत्सव त्यामुळे घरे, दुकाने आणि परिसर सर्वत्र झगमगाट आलाच. मात्र हा झगमगाट करताना विद्युत रोषणाईचा आधार प्रत्येकाकडून घेतला जातो, त्याशिवाय झगमगाट अपूर्णच राहतो. त्यामुळे प्रत्येकाने रोषणाईची सजावट करताना खबरदारी घेणेही तितकेच गरजेचे आहे, अन्यथा लहान चूकही महागात पडू शकते.  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराघरांमध्ये सजावटीची लगबग सुरू झाली आहे. घरामधील एक व्यक्ती नव्हे तर अवघे कुटुंब प्रकाशाचा उत्सव अर्थात दीपोत्सव साजरा करण्यासाठी आपापल्या परीने वेगवेगळ्या कामात व्यस्त आहे. घरांची स्वच्छता, फराळाच्या पदार्थांची तयारी, रंगरंगोटी आदी कामे आटोपली आहेत. आता युद्धपातळीवर रोषणाईच्या कामांना वेग आला आहे. सजावटीचे साहित्य खरेदीपासून ते आकर्षक पद्धतीने घरे दुकानांवर लावण्यासाठी नागरिकांकडून तयारी केली जात आहे.  दरम्यान, विद्युत माळा लावताना त्याची विजेच्या मुख्य बोर्डमध्ये जोडणी करताना किंवा एक्स्टेंशन बोर्डमधून जोडणी करताना अनवधानाने लक्ष विचलित झाल्यास किंवा प्लगपीन लावताना धन-ऋणच्या ऐवजी ऋण-धन पद्धतीने वायरी जोडल्या गेल्यास विजेचा धक्का लागू शकतो. त्यामुळे खबरदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. लहानशी चूक किंवा दुर्लक्षामुळे दुर्दैवी अपघाताला निमंत्रण मिळू शकते.  कारण यावेळी व्यक्तीचा थेट संपर्क विजेच्या प्रवाहसोबत येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. विद्युत रोषणाईचे काम करताना लहान मुलांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण नवीन वस्तू बघून उत्सुकतेपोटी त्यांच्याकडून त्या घेण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असते.
... अशी घ्यावी खबरदारी
विद्युत माळा जुन्या असल्या तर खबरदारी अधिक घ्यावी. वर्षभरानंतर त्या माळा बाहेर काढलेल्या असल्यामुळे वायरी कुरतडल्या गेलेल्या नाही किंवा त्याचे बल्ब हे ‘शॉर्ट’ झालेले तर नाही ना याबाबत तपासणी करूनच त्यानंतर माळांच्या वायरी मुख्य वीज बोर्डामध्ये टाकाव्या, अन्यथा शॉर्टसर्किटचा धोका ओढवू शकतो. मुख्य बोर्डामधून वीजप्रवाहाशी विद्युत माळेचा संपर्क आल्यास त्यानंतर त्याची दुरुस्ती करण्याचे धाडस करू नये, बोर्डाचे बटन बंद करून वायरी काढाव्या व त्यानंतरच योग्य ती दुरुस्ती करावी. वायर ज्या ठिकाणी कट झालेली असेल तेथे वरील बाजूने उत्तम दर्जाच्या वायर पीवीसी टेपने चिकटवाव्या. यावेळी माळाच्या दोन्ही माळा एकत्र चिटकल्या जाणार नाही, याची काळजी घ्यावी.

Web Title:  Do not play games with power connectivity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.