विद्यार्थ्यांना शिक्षा करू नका दखल : शिक्षण विभागाचे मुख्याध्यापकांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:24 AM2018-02-11T01:24:00+5:302018-02-11T01:24:32+5:30
नाशिक : नाशिकरोड उपनगर परिसरातील एमराल्ड हाइट्स पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेतली .
नाशिक : नाशिकरोड उपनगर परिसरातील एमराल्ड हाइट्स पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेतली असून, शिक्षण अधिकाºयांना शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश दिले आहे. शिक्षण हक्क कायदा (आरटीई-२००९) नुसार विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकरणाची शारीरिक, मानसिक, शिक्षा देण्यास मनाई आहे. असे असताना एमराल्ड शाळेतील विद्यार्थ्यांना गंभीर मारहाण केल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केला होता. या प्रकरणानंतर संबंधित शाळेची मान्यता तत्काळ रद्द करण्याची शिफारस मनपा शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याकडे करण्यात आली होती. शिक्षण खात्याच्या या निर्णयामुळे मनमानी कारभार करून विद्यार्थी व पालकांचा आर्थिक व मानसिक छळ करणाºया शिक्षण संस्थांना दणका बसला असतानाच शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी शाळेत शिक6णाºया विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा करू नये, असे पत्र प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना दिले आहे. या आदेशाची महापालिकेचे शिक्षणाधिकारी नितीन उपासणी यांनी तत्काळ अंमलबजावणी केली असून, नाशिक महापालिकेच्या शाळांसह शहरातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना या पत्राची प्रत पाठवून शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक अथवा मानसिक शिक्षा देण्यास मनाई असल्याचे सूचित केले आहे. विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा केली जात असल्याचे निदर्शनास येत असून घटनांना आवर घालण्यासाठी दक्षता पथक स्थापन करून शिक्षक व पालकांची बैठक घेऊन जनजागृती करण्याचे आवाहनही शिक्षण उपसंचालकांनी पत्रातून केले आहे.