सटाण्याला पाणी देण्यास विरोध नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:42 AM2019-05-31T00:42:31+5:302019-05-31T00:44:37+5:30
लोहोणेर : पूनद धरणातून सटाणा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइनद्वारे काम सुरु करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर दिले आहेत. योजने संदर्भात ठेंगोडा येथील श्रीसिद्धिविनायक मंदिरात गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांची बैठक झाली.
लोहोणेर : पूनद धरणातून सटाणा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइनद्वारे काम सुरु करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर दिले आहेत. योजने संदर्भात ठेंगोडा येथील श्रीसिद्धिविनायक मंदिरात गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांची बैठक झाली.
यावेळी उपस्थित शेतकºयांनी सटाणा शहराला पाणी देण्यास कुठलाही विरोध नसून हे पाणी डावा सुळे कालव्याद्वारे ठेंगोडा पाझर तलावात टाकून मग पाइपलाइनद्वारे घेऊन जाण्याची मागणी केली. तसेच गिरणानदीवर ठेंगोडा गणपती मंदिराच्या पश्चिमेला केटीवेअर बंधारा बांधून तेथून वॉटर सप्लायद्वारे पाणी नेण्यास कुणाचाही विरोध राहणार नाही यामुळे सर्वांच्या शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने दि.१ जून रोजी पूनद धरण कार्यस्थळावर पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रभाव क्षेत्रात येणाºया सर्व जनतेने यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पूनद जलवाहिनी विरोध संघर्ष समितीचे अध्यक्ष देवीदास पवार यांनी केले .
यावेळी खामखेडा येथील अण्णा पाटील, ठेंगोडा येथील सतीश देशमुख यांनी सटाणा शहराला पाणी देण्यास विरोध नसून पाइपलाइनद्वारे पाणी घेऊन जाण्यास विरोध असल्याचे सांगितले.
यावेळी कळवणचे महेंद्र हिरे, संतोष मोरे, कुबेर जाधव, राजेंद्र हिरे, अनिल धामणे, काशीनाथ धामणे, निंबा धामणे, शांताराम वाघ, पंडितराव निकम, शांताराम जाधव, दादाजी जाधव, बाळासाहेब शेवाळे, दादाजी बोरसे, परशुराम पाकळे, मार्कंड पाटील, मधुकर व्यवहारे, वसंत शिंदे, दिलीप अहिरे, पंकज बोरसे, मदन निकम, बापू आहिरे, केवळ वाघ, शंकर निकम दिलीप शिवले, प्रकाश पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाइपलाइनद्वारे पाणी नेण्यास सर्व शेतकरी, आदिवासी बांधव व खोºयातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन कुठलेही राजकारण न करता खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, सदस्य व सर्व पक्षांच्या पदाधिकाºयांना सभेसाठी आमंत्रित करण्यात आले असून, मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आले आहे.