कळवण तालुक्यातील कालव्याचे सर्वेक्षण करु न तात्काळ दुरु स्ती अन् ४५ दिवसांचे आरक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 06:02 PM2020-01-15T18:02:56+5:302020-01-15T18:04:02+5:30

कळवण : अर्जुनसागर (पुनंद)व चणकापूर प्रकल्प या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला आहे. सन २०१९-२० च्या रब्बी हंगामात अर्जुन सागर (पुनंद ) प्रकल्पातून कालव्यांना रब्बीसाठी किमान १ व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी किमान ३ आवर्तने आरक्षित करावे व कळवण तालुक्यातील कालव्याचे सर्वेक्षण करु न तात्काळ दुरु स्ती करावी अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत केली.

Do not survey the canal in Kalvan taluka and make immediate reservation for 3 days immediately | कळवण तालुक्यातील कालव्याचे सर्वेक्षण करु न तात्काळ दुरु स्ती अन् ४५ दिवसांचे आरक्षण करा

मुंबई येथे मंत्रालयात छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नाशिक जिल्हा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कळवण, सुरगाणा तालुक्यातील पाणी प्रश्नासंदर्भात भूमिका मांडताना नितीन पवार सोबत दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, नरहरी झिरवाळ, अलका अहिरराव आदी.

Next
ठळक मुद्देजिल्हा कालवा सल्लागार समिती बैठकीत आमदार नितीन पवारांची मागणी

कळवण : अर्जुनसागर (पुनंद)व चणकापूर प्रकल्प या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला आहे. सन २०१९-२० च्या रब्बी हंगामात अर्जुन सागर (पुनंद ) प्रकल्पातून कालव्यांना रब्बीसाठी किमान १ व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी किमान ३ आवर्तने आरक्षित करावे व कळवण तालुक्यातील कालव्याचे सर्वेक्षण करु न तात्काळ दुरु स्ती करावी अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत केली.
यावेळी छगन भुजबळ यांना कळवण व सुरगाणा तालुक्यातील सिंचन प्रश्नासंदर्भातील निर्माण झालेल्या अडचणी व विविध मागणीचे निवेदन आमदार पवार यांनी यावेळी दिले.
नाशिक जिल्हा रब्बी व उन्हाळा हंगाम कालवा सल्लागार समितीची बैठक नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली.
नाशिक जिल्ह्यातील रब्बी व उन्हाळा हंगामासाठी सिंचन व बिगर सिंचन आवर्तनासाठी पाण्याचा दुरु पयोग होणार नाही याकडे लक्ष देऊन सिंचन आवर्तनाचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश भुजबळ यांनी बैठकीत दिले. यावेळी कृषीमंत्री दादा भुसेसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
चणकापूर प्रकल्प-गिरणा डाव्या व उजव्या कालव्यास रब्बी हंगामात १ आवर्तनाचे नियोजन आहे. तसेच सिंचन व बिगर सिंचन आवर्तन एकित्रतपणे नियोजन करु न होणाऱ्या बचतीतून मर्यादित क्षेत्रासाठी उन्हाळ्यात आवर्तन देण्याचे निर्देश भुजबळ यांनी बैठकीत दिले.
भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या यंत्रणेला आवर्तन नियोजन व कालव्याच्या दुरु स्तीचे सर्वेक्षण करून दुरु स्ती करण्याची सूचना केली. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह जलसंपदाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अलका आहेरराव व अधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: Do not survey the canal in Kalvan taluka and make immediate reservation for 3 days immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.