पिकांचे पारंपरिक वाण वाया घालवू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:03 AM2018-12-21T01:03:07+5:302018-12-21T01:03:43+5:30

पुढील पिढ्या सक्षम करण्यासाठी पिकाचे पारंपरिक वाण जपून ठेवण्याची आवश्यकता आहे. या पिकांमध्ये असणारी नैसर्गिक मुलद्रव्ये आपली प्रतिकारशक्ती वाढविणारी आहेत, असे मत पारंपरिक पिकांच्या विविध वानांचे जतन करणाºया शेतकरी राहीबाई पोपरे यांनी व्यक्त केले.

Do not waste traditional varieties of crops! | पिकांचे पारंपरिक वाण वाया घालवू नका !

कृषी तंत्रज्ञान महोत्सवात बोलताना पारंपरिक पिकांच्या वाणांचे बी संवर्धन करणाऱ्या राहीबाई पोपरे. व्यासपीठावर श्याम रनाळकर, डॉ. दिनेश भोंड, कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देराहीबाई पोपरे : मुक्त विद्यापीठात कृषी तंत्रज्ञान महोत्सवास प्रारंभ

नाशिक : पुढील पिढ्या सक्षम करण्यासाठी पिकाचे पारंपरिक वाण जपून ठेवण्याची आवश्यकता आहे. या पिकांमध्ये असणारी नैसर्गिक मुलद्रव्ये आपली प्रतिकारशक्ती वाढविणारी आहेत, असे मत पारंपरिक पिकांच्या विविध वानांचे जतन करणाºया शेतकरी राहीबाई पोपरे यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून गुरुवारपासून (दि.२०) कृषी तंत्रज्ञान महोत्सवास सुरुवात झालीय याप्रसंगी राहीबाई बोपरे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई वायुनंदन होते. कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, नाशिकचे विभागीय वनाधिकारी श्याम रनाळकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रावसाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. नैसर्गिक पद्धतीने गावरान बी-बियाणांचा वापर, प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढाकार घेणाºया व आदिवासी परिसरातून ५४ पिकांचे ११६ जातींचे गावरान वाणाचे जतन करून संवर्धन करणाºया राहीबाई पोपरे यांनी कृषी तंत्रज्ञान महोत्सवातून शेतकºयांना मार्गदर्शन के ले. त्या म्हणाल्या, रासायनिक खते न वापरता नैसर्गिक पद्धतीतून येणारी पिके आपल्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी महत्त्वाची आहे. गावरान बियाणांचे जतन केले नाही, तर पुढच्या पिढ्यांना ती फोटोतूनच दाखवावी लागतील, पारसबागेत घरगुती गावरान पद्धतीने भाजीपाला पिकवायला सुरुवात केल्यानंतर त्यातूनच जुन्या गावरान बियाणांच्या वाणांच्या संग्रहाची गोडी लागली आणि हळूहळू या पारंपरिक वाणांचे महत्त्व लक्षात आल्याने त्यातूनच ५४ पिकांचे ११६ जातींचे वाण जतन करता आल्याचे त्यांनी सांगितले. कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन म्हणाले, की अल्पभुधारक शेतकºयांनी निराश न होता अशा पद्धतीच्या प्रयोगातून स्वत:ला समृद्ध करावे. यातूनच प्रगतीचे रस्ते सापडतील. डॉ. दिनेश भोंडे यांनी बांबू लागवड आणि त्याच्या प्रयोगासंदर्भात मार्गदर्शन केले. श्याम रनाळकर यांनी सामाजिक वनीकरणाचे महत्त्व सांगितले. डॉ. रावसाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नितीन ठोके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. श्याम पाटील यांनी आभार मानले.

(आर फोटो-२० वायसीएमओयू)

Web Title: Do not waste traditional varieties of crops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.