उद्या माध्यान्हपर्यंत करा घरातील बाप्पांची प्राणप्रतिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 01:16 AM2020-08-21T01:16:29+5:302020-08-21T01:16:59+5:30
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विघ्नहर्ता बाप्पाचे ११ दिवस अगोदर आगमन होत असून, शनिवारी (दि. २२) भाद्रपद शु. चतुर्थीला घरोघरी विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:४७ ते दुपारी १:५७ पर्यंत घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येणार असल्याचे पंचांगकर्त्यांनी म्हटले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना मात्र मध्यान्हानंतरदेखील करता येऊ शकेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नाशिक : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विघ्नहर्ता बाप्पाचे ११ दिवस अगोदर आगमन होत असून, शनिवारी (दि. २२) भाद्रपद शु. चतुर्थीला घरोघरी विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:४७ ते दुपारी १:५७ पर्यंत घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येणार असल्याचे पंचांगकर्त्यांनी म्हटले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना मात्र मध्यान्हानंतरदेखील करता येऊ शकेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अवघ्या काही तासांवर बाप्पाचे आगमन येऊन ठेपले आहे. त्यामुळे घरोघरी आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गणेशमूर्ती स्टॉलवर होणारी गर्दी आणि त्यातून वाढणारा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेकांनी अगोदरच बाप्पांची मूर्ती घरी आणून ठेवली आहे तर अनेकांनी मूर्ती आरक्षित करून ठेवली आहे. शनिवारी बाप्पांचे आगमन होईल, त्याबाबाबत दाते पंचांगचे मोहनराव दाते यांनी म्हटले आहे, शनिवारी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४.४७ वाजेपासून ते दुपारी १.५७ वाजेपर्यंत गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना करता येणार आहे. त्याकरिता भद्रादी (विष्टी) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही.
बुधवारी करा गौरी पूजन
मंगळवार, दिनांक २५ आॅगस्ट रोजी अनुराधा नक्षत्रावर म्हणजे दुपारी १:५९ नंतर गौरी आवाहन करता येईल, ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे, असे असल्याने दि. २६ रोजी बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने दि. २७ रोजी गुरुवारी दुपारी १२:३७ नंतर गौरी विसर्जन करता येईल. काही वेळेस गौरी आवाहन किंवा विसजर्नाकरिता ठरावीक वेळेची मर्यादा नसते मात्र यावर्षी आवाहन व विसजर्नाकरिता मर्यादा दिलेली आहे त्या मर्यादेत कधीही आवाहन आणि विसर्जन करता येईल.