सर्वसामान्यांची कामे करा : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:14 AM2018-03-03T00:14:32+5:302018-03-03T00:14:32+5:30

शरद पवार यांची सभा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील राष्टÑवादीचा कार्यकर्ता सभेसाठी आला पाहिजे, असे आवाहन माजी ग्रामीण विकास मंत्री व नाशिक जिल्ह्याचे प्रभारी आमदार जयंत पाटील यांनी चांदवड तालुका राष्टÑवादी कॉँग्रेसने आयोजित बैठकीत बोलताना केले.

 Do public work: Jayant Patil | सर्वसामान्यांची कामे करा : जयंत पाटील

सर्वसामान्यांची कामे करा : जयंत पाटील

Next

चांदवड : शरद पवार यांची सभा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील राष्टÑवादीचा कार्यकर्ता सभेसाठी आला पाहिजे, असे आवाहन माजी ग्रामीण विकास मंत्री व नाशिक जिल्ह्याचे प्रभारी आमदार जयंत पाटील यांनी चांदवड तालुका राष्टवादी कॉँग्रेसने आयोजित बैठकीत बोलताना केले.  राष्टवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्टतील हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपाची सभा नाशिकच्या गोल्फक्लब मैदानावर शनिवारी (दि. १०) दुपारी चार वाजता होत आहे. नाशिक जिल्ह्यातील नियोजनाची बैठक येथील जिल्हा बॅँकेच्या सभागृहात झाली.  यावेळी जयंत पाटील म्हणाले की, येत्या एक ते दीड वर्षात दोन्ही निवडणुका लागणार आहेत त्यात सर्वच कार्यकर्त्यांनी निष्ठेने कामाला लागा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, माजी खासदार देवीदास पिंगळे, आमदार हेमंत टकले, आमदार जयंत जाधव, माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, संजय चव्हाण, अंबादास बनकर, श्रीराम शेटे, नूतन अहेर, भारती पवार महिला अध्यक्ष प्रेरणा बलकवडे, गजानन शेलार, दत्तात्रय पाटील, बाळासाहेब कर्डक, रंजन ठाकरे, माजी आमदार शांताराम अहेर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक सयाजीराव गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन विजय जाधव यांनी केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, माजी आमदार संजय चव्हाण, माणिकराव शिंदे, यतिन पगार, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, रईस फारुकी (नांदगाव) राजेंद्र देवरे (उमराणे) बाळासाहेब वाणी (मालेगाव), दत्तात्रय वाकचौरे, बाळासाहेब कर्डक आदींनी विचार व्यक्त केले.
तालुकानिहाय अहवाल
पंडित निकम (देवळा), साहेबराव पाटील (नांदगाव), जनार्दन भोये  (सुरगाणा), गुलाबराव चव्हाण (मालेगाव), अनिल कुंदे ( निफाड), शैलेश सूर्यवंशी (सटाणा), भास्कर भगरे (दिंडोरी), संतोष गुप्ता (नांदगाव), राजाभाऊ पगारे (मनमाड), साहेबराव मढवई (येवला), नितीन पवार  (कळवण), दामू राऊत (पेठ), सुनील अहेर (देवळा) महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, राष्टÑवादी सेल अध्यक्ष यशवंत शिरसाठ यांनी आपापल्या तालुक्यातील हल्लाबोल आंदोलनाबाबतच्या नियोजनाचा अहवाल सादर केला.

Web Title:  Do public work: Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.