पुणे आणि नाशिक मनपाला वेगळे नियम आहेत का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:06 AM2018-06-13T01:06:26+5:302018-06-13T01:06:26+5:30
विविध सणांसाठी यापुढे खर्च न करण्याच्या राज्य शासनाने पाठविलेल्या आदेशाची अंमलबजावणी नाशिक महापालिका करीत असली तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकादेखील पालखी स्वागत सोहळ्याचे स्वागत करते, मग नाशिक महापालिकेचा वेगळा निर्णय कसा? असा प्रश्न विविध मान्यवरांनी केला आहे.
नाशिक : विविध सणांसाठी यापुढे खर्च न करण्याच्या राज्य शासनाने पाठविलेल्या आदेशाची अंमलबजावणी नाशिक महापालिका करीत असली तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकादेखील पालखी स्वागत सोहळ्याचे स्वागत करते, मग नाशिक महापालिकेचा वेगळा निर्णय कसा? असा प्रश्न विविध मान्यवरांनी केला आहे. नाशिक महापालिकेने संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी खर्च न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रमजान ईदच्या दिवशी गोल्फ क्लबवर मंडप उभारते त्यासदेखील नकार देण्यात आला आहे. महापालिकेने परंपरा जतन करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असताना महापालिका परंपरा खंडित करीत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका ही शहराची पालक संस्था असून, विविध धर्मांच्या कार्यक्रमातील सहभागामुळे शहरातील सामाजिक सलोखा आणि सौहार्द टिकून राहतो. याशिवाय यात्रेत किंवा धार्मिक सोहळ्यात सहभागी नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे हे कामच असल्याने त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरूच ठेवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
महापालिकेच्या निर्णयामुळे वेगळा संदेश जाणार
नागरिकांकडून कर वसूल केला जातो तर नागरिकांच्या सण-उत्सवासाठी महापालिकेकडून योग्य ते सहकार्य करावे. कारण त्यामुळे शहरात सद्भावनेचे वातावरण होते. महापालिके च्या या निर्णयामुळे समाजात वेगळा संदेश जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्षुल्लकप्रकारची कामे जी सहजपणे महापालिकेला यंत्रणेच्या माध्यमातून करणे शक्य आहे. नमाजपठणाचा सोहळा वर्षात केवळ दोनदा इदगाह मैदानावर होतो. महापालिकेने आपले कर्तव्य समजून या सोहळ्यासाठी इदगाहवर पाण्याची सुविधा तसेच मैदानाचे सपाटीकरण आदी कामे करून देणे गरजेचे आहे. मंडप उभारणी लोकप्रतिनिधींसाठी केली जात होती, त्याचा नमाजपठणासाठी जमणाऱ्या लोकांना कुठलाही फायदा होत नव्हता. त्यामुळे मंडप न उभारण्याचा निर्णय योग्य आहे. - मौलाना मुफ्ती सय्यद आसिफ, धर्मगुरू
महापालिकेचा निर्णय स्वागतार्ह पण...
महापालिकेच्या वतीने दरवर्षी दोनवेळा ईदच्या सामूहिक नमाजपठणाच्या सोहळ्यासाठी मैदानाचे सपाटीकरण, खड्डे बुजविणे तसेच दोन्ही प्रवेशद्वारांवर शूचिर्भूत होण्यासाठी पाण्याची सुविधा पुरविली जात होती. कुठल्याही प्रकारचे शेड इदगाहच्या वास्तूपुढे महापालिकेने कधीही बांधले नाही. केवळ राजकीय व्यक्ती जे समाजबांधवांना शुभेच्छा देण्यासाठी येतात त्यांच्या सावलीसाठी महापालिकेकडून मंडप उभारण्यात येत होता. मंडप न उभारण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे; मात्र अन्य सुविधा पुरविणे हे महापालिकेचे क र्तव्य आहे. कारण इदगाह मैदान मुस्लीम समाजासाठी वक्फ करण्यात आलेले असून, ते समाजाच्या मालकीचे आहे. या जागेचा व्यावसायिक वापर करून महापालिक ा दरवर्षी भाडेतत्त्वाच्या स्वरूपाने महसूल गोळा करते. याबाबत समाजाकडून कधीही आक्षेप घेतला गेला नाही.
- हाजी वसीम पिरजादा, अध्यक्ष नुरी अकादमी