फिट राहाण्यासाठी घरी बसूनच करा योगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:10 PM2020-05-22T12:10:44+5:302020-05-22T12:13:34+5:30

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सध्या बहुतांशी नागरीक घरीच आहेत. आरोग्याची सजगता त्यातून जाणवत असली तरी घरी राहून कृतीतून आरोग्य सजगता दाखवली पाहीजे. त्यामुळे सध्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि एकंदरच फिट राहाण्यासाठी योगासने करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सर्वांनी योगा करण्याची गरज आहे. अशाप्रकारच्या लॉक डाऊन योगाला केव्हाही सुरूवात करून आपण फिट राहू शकतात.

Do yoga at home to stay fit! | फिट राहाण्यासाठी घरी बसूनच करा योगा!

फिट राहाण्यासाठी घरी बसूनच करा योगा!

Next
ठळक मुद्देप्रतिकार शक्ती वाढतेधान्य धरणा करावीचाळीस मिनीटे करा योगा

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सध्या बहुतांशी नागरीक घरीच आहेत.
आरोग्याची सजगता त्यातून जाणवत असली तरी घरी राहून कृतीतून आरोग्य सजगता
दाखवली पाहीजे. त्यामुळे सध्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि एकंदरच
फिट राहाण्यासाठी योगासने करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सर्वांनी योगा
करण्याची गरज आहे. अशाप्रकारच्या लॉक डाऊन योगाला केव्हाही सुरूवात करून
आपण फिट राहू शकतात.
सध्याची नाजूक परिस्थिती आपणा सर्वांनाच माहीत आहे. या लॉकडाउनमुळे सर्व
जण घरात बसून आहोत. घरातच आनंदी राहण्यासाठी कोणी खाण्याचे पदार्थ करून
पाहत आहे, तर कोणी गाण्याचा रियाज करीत आहेत तर कोणी नृत्याचा अभ्यास
करीत आहे. प्रत्येक जण आपापल्या आनंदी कसे राहायचे, काहीतरी करण्यात
सर्जनशील कसे राहायचे या प्रयत्नात असतात. मात्र, दुसरीकडे अनेकांचे
घराबाहेर पडणे, मोकळ्या हवेत फिरणे, जॉगींगला जाणे, ओपन जीमवर व्यायाम
करणे बंद आहेत काही जण योगा क्लासेस लावतात तर काही जण जिममध्ये जातात.
काही जण व्यायामासाठी सायकलींग करतात किंवा पांडवलेणे- चांभार लेण्यावर
चढ उतार करतात. परंतु हे सध्या बंद आहे. व्यायाम बंद असल्याने अनेक जण
आमचे घरी बसून नुसते वजन वाढत आहे, अशी तक्र ार करीत आहेत. या तक्र ारीत
तथ्य आहे परंतु बाहेर पडता येत नाही म्हणून काहीच करता येत नाही असे नाही
तर आपण घरी बसल्या बसल्या योगाभ्यास करू शकतो.
योगासनांचे अनेक प्रकार आहेत. प्राणायाम, सूर्यनमस्कार हे
नित्याचेच आहेत. परंतु खास मधुमेहींसाठी,संधिवातासाठी, गरोदर महिलांसाठी,
दम्यासाठी, पाठीच्या मणक्याचे दुखणे यासाठी वेगवेगळे प्रकार आहेत. सध्या
जण वर्क फ्रॉम होम करतात, त्यांच्यासाठी खुर्चीवर बसून देखील योगासने
करता येतात. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील लवचिकता वेगळी असते. पण काही
कालावधी नंतर ही लवचीकता नक्कीच वाढते.
सामान्यत: चाळीस मिनीटे योगासने आणि प्राणायाम हा पंधरा ते वीस मिनिटे
करणे गरजेचे आहे. असे करताना गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी,
त्यांनी कपालभाती प्राणायाम टाळावा. अनुलोम विलोम प्राणायाम यांच्यासाठी
योग्य आहे. आत्ता उन्हाळ्यात शक्य झाले तर डाव्या नासिकेने श्वास घेणे
आणि उजव्या नासिकेने सोडणे. असे किमान दहा वेळा तीन सेट केले तर जास्त
फायदेशीर आहे. योगाभ्यासामुळे आपल्या शरीरावर तसेच मनावर फारच सकारात्मक
परिणाम होत असतो. ध्यान धारणे मुळे आणि प्राणायाम करण्यामुळे आपली
रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते.
आपण योगासने शिकण्यासाठी क्लासला नाही जाऊ शकत, पण आजकाल आॅनलाइनचा
जमाना आला असून, असे अनेक यु-ट्युब चॅनल आहेत. याचा फायदा घेऊन आपण हा
वेळ आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी वापरु शकतो. अर्थात, असे करताना एकदम
एका दिवसात अनेक योगासने करणे घातकारक ठरू शकतो. तेव्हा हळू हळू योगा करत
आपला योगाभ्यास वाढवावा.
तेव्हा मस्त रहा, आनंदी रहा, घरात रहा आण ि खुशाल रहा !
- अर्चना दीक्षीत, योग शिक्षक

Web Title: Do yoga at home to stay fit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.