योगा करा, कोरोनाला दूर ठेवा; महापौरांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:52 PM2020-04-24T22:52:30+5:302020-04-24T23:43:46+5:30
नाशिक : सध्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असले तरी योगासन आणि काही पोषक तत्त्वांच्या आहारात वापर करून कोरोनाला दूर ठेवा, असा सल्ला महापौर सतीश कुलकर्णी यांनी नागरिकांना दिला आहे. याशिवाय शासनाने दिलेल्या पथ्यांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापौरांनी पत्रकार परिषदेत केले.

सध्या सर्वत्र कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे. मात्र, योग साधना केल्यास प्रतिकारशक्ती वाढते. योगगुरू रामदेव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नाशिक शिर्डीसह अन्य अनेक ठिकाणी योगा केल्याने त्याचे अनुकूल परिणाम अनुभवत आहोत. प्राणायाम व आहारात काही बदल केल्यास निश्चितपणे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढून साथीच्या आजारापासून मुक्तता होऊ शकते, असे योगतज्ज्ञ व योगगुरुंचे मत आहे. नागरिकांनी रोजच्या दिनचर्येमध्ये प्राणायाम म्हणजेच ओमकार (अकरा वेळा), तसेच भस्त्रिका, अनुलोम -विलोम, कपालभाती, सूर्यनमस्कार, दीर्घश्वसन आणि भ्रामरी नियमित केले पाहिजे.