तुम्हाला ही लक्षणे आहेत का? मग दुर्लक्ष करु नका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 07:21 AM2022-01-24T07:21:09+5:302022-01-24T07:21:29+5:30

हा व्हेरिएंट घातक नसला तरी याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करता येत नाही.

Do you have these symptoms? Then don't ignore it corona omicron | तुम्हाला ही लक्षणे आहेत का? मग दुर्लक्ष करु नका

तुम्हाला ही लक्षणे आहेत का? मग दुर्लक्ष करु नका

Next

ओमायक्रॉन हा कोरोना विषाणूचा व्हेरिएंट हातपाय पसरू लागला आहे. देशभरातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या आता दहा हजारांहून अधिक झाली आहे. डेल्टाइतका हा व्हेरिएंट घातक नसला तरी याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करता येत नाही.

लक्षणे कशा प्रकारची?
nडेल्टापेक्षा सौम्य असलेल्या ओमायक्रॉनची लक्षणे विभिन्न आहेत.
nहलकासा ताप येणे, घशात खवखवणे, प्रचंड अंगदुखी, रात्री घाम येणे, उलट्या होणे आणि 
भूक मंदावणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत.
nया प्रकारात पदार्थाची चव न समजणे किंवा वास न येणे ही लक्षणे आढळलेली नाहीत.
nडेल्टा आणि ओमायक्रॉनमध्ये हाच मुख्य फरक असून रुग्णसंख्या वाढत असली तरी तीव्रता कमी आहे.

आहे सौम्य तरीही...
nडेल्टापेक्षा ओमायक्रॉन खूपच सौम्य आहे.
nओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही.
nडेल्टापेक्षा ओमायक्रॉनचा संसर्गदर वेगवान, तब्बल चारपट, आहे.

डोकेदुखी आणि नाक सतत गळणे ही ओमायक्रॉनची दोन लक्षणे चिंतेची आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ही दोन लक्षणे सामान्य वाटली तरी ती कोरोना किंवा ओमायक्रॉनचीही असू शकतात.

nडॉक्टरांना अशा तक्रारींचे २० रुग्ण आढळून आले. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करून नका असा सल्ला लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेच्या साथरोग विषयाच्या प्राध्यापिका आयरिन पीटरसन यांनी दिला आहे.

nडोकेदुखी आणि नाक सतत गळणे ही लक्षणे आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांना भेटणे, चाचणी करून घेणे आणि स्वत:ला क्वारंटाइन करून घेणे या तीन गोष्टी करणे गरजेेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 

 

Web Title: Do you have these symptoms? Then don't ignore it corona omicron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.