डॉक्टरअभावी पशुवैद्यकीय दवाखाने मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 05:54 PM2019-02-21T17:54:43+5:302019-02-21T17:55:50+5:30

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा व वाखारी येथे लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या दोन वर्षांपासून पशुधन विकास अधिकारी येत नसल्याने तसेच देखभाल दुरु स्ती अभावी परिसरातील पशुपालकांना ऐन दुष्काळात पाळीव जनावरांना खाजगी डाक्टरची मदत घ्यावी लागत असून सदर दवाखान्यावर कायमस्वरूपी डॉक्टरची मागणी केली जात आहे.

Doctor in-patient Veterinary Disasters Disrupted | डॉक्टरअभावी पशुवैद्यकीय दवाखाने मोडकळीस

डॉक्टरअभावी पशुवैद्यकीय दवाखाने मोडकळीस

googlenewsNext
ठळक मुद्देनांदगाव : ऐन दुष्काळात पशुपालकांची खाजगी डॉक्टरांकडे धाव

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा व वाखारी येथे लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या दोन वर्षांपासून पशुधन विकास अधिकारी येत नसल्याने तसेच देखभाल दुरु स्ती अभावी परिसरातील पशुपालकांना ऐन दुष्काळात पाळीव जनावरांना खाजगी डाक्टरची मदत घ्यावी लागत असून सदर दवाखान्यावर कायमस्वरूपी डॉक्टरची मागणी केली जात आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या मुलभूत सुविधे अंतर्गत नांदगाव तालुक्यातील साकोरा व वाखारी परिसरातील पाळीव जनावरांना वैद्यकीय सेवा मिळावी या हेतूने बारा वर्षांपूर्वी लाखो रु पये खर्च करून प्रथम श्रेणीचे दवाखाने बांधण्यात आले होते. सुरूवातीला याठिकाणी पशुधन विकास अधिकारी व व्रणोपचारक यांच्या सतर्कतेमुळे जनावरांना चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा मिळाली. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे तसेच देखभाल दुरु स्ती अभावी या दवाखान्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी पशुधन विकास अधिकारी अलई यांची बदली झाली असून न्यायडोंगरी येथील पशुधन विकास अधिकारी बलवंतकर यांना साकोरा व वाखारी या ठिकाणचा अतिरिक्त कार्यभार दिला असतांना त्यांनी आजपर्यंत सदर गावांना भेटी सुध्दा दिलेल्या नाहीत. अनेकवेळा काही शेतकऱ्यांनी फोनवर विचारपूस केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. नाईलाजाने शेतकºयांना खाजगी डॉक्टर मदत घ्यावी लागत आहे.
ऐन दुष्काळात पाळीव जनावरांची संख्या कमी झाली आहे. तरी आज फक्त दुभत्या जनावरांसाठी योग्य वेळी उपचारासाठी सदर दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नसल्याने शेतकºयांची कुचंबणा होत आहे.
सदर दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी, व्रणोपचारक तसेच शिपाई असे तीन पदे केवळ कागदोपत्री पूर्ण असतांना दोन वर्षांपासून एकमेव व्रणोपचारक कार्यरत आहे. तसेच शासनाच्या देखभाल दुरुस्ती अभावी पशुवैद्यकीय दवाखाने मोडकळीस आले असून संरक्षक भिंतींचे तार कंपाऊंड, गेट, खिडक्या चोरून नेल्याने या दवाखान्यावरच उपचाराची वेळ आली आहे. यासंदर्भात संबधित विभागाने लक्ष केंद्रित करून या दवाखान्यांची तात्काळ दुरूस्ती करून कायमस्वरूपी डॉक्टरची नेमणूक करावी अशी मागणी सरपंच अनिता सोनवणे, उपसरपंच संदिप बोरसे, रामदास आहिरे, भगवान मंडलिक, जिभाऊ बोरसे, सुकदेव कदम, भगवान सोमासे, नरेंद्र सुरसे, अशोक चव्हाण, दिगंबर बोरसे, सर्जेराव बोरसे, आण्णा पठाडे, सुपडू सुरसे, शिरीष पठाडे, प्रल्हाद मंडलिक, अनिल बोरसे, एकनाथ सोमासे, संजय बोरसे आदींनी केली आहे.
(फोटो २१ साकोरा)

Web Title: Doctor in-patient Veterinary Disasters Disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.