डॉक्टरने स्वखर्चाने केली रस्त्याची मलमपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:34 AM2018-08-14T01:34:21+5:302018-08-14T01:34:38+5:30

माणूस सातासमुद्रा-पल्याड गेला तरी त्याची आपल्या गावाशी असलेली नाळ तुटू शकत नाही. काही लोक हे आपले सामाजिक दायित्व जबाबदारीने निभावत असतात.

Doctor stays dressed in a self-arranged road | डॉक्टरने स्वखर्चाने केली रस्त्याची मलमपट्टी

डॉक्टरने स्वखर्चाने केली रस्त्याची मलमपट्टी

Next

लासलगाव : माणूस सातासमुद्रा-पल्याड गेला तरी त्याची आपल्या गावाशी असलेली नाळ तुटू शकत नाही. काही लोक हे आपले सामाजिक दायित्व जबाबदारीने निभावत असतात. शिरवाडे वाकद येथील भूमिपुत्र डॉ. श्रीकांत आवारे यांनी गावाच्या रस्त्यासाठी घेतलेला पुढाकार आदर्शवत व प्रेरणादायी असाच आहे. ढिम्म प्रशासनामुळे रेंगाळलेल्या रस्त्याला मलमपट्टी करण्याचे काम डॉ. आवारे यांनी स्वखर्चाने करून देत लासलगाव-जवळील शिरवाडे वाकदच्या नागरिकांचा प्रवास सुखद केला  आहे. मुखेड, सत्यगाव, वाकद, शिरवाडे या चार गावांची रहदारी असलेल्या शिरवाडे ते वाकद या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. पावसाळ्यात तर रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असते. माजी जि. प. सदस्य हरिश्चंद्र भवर व माजी जि. प. सदस्या किरण थोरे यांच्या प्रयत्नातून व जि.प. च्या वाडीजोड योजनेतून या रस्त्याचे काही काम झाले होते. मात्र काही काम अधुरे राहिले होते. त्यामुळे नागरिकांची खूपच गैरसोय होत होती.  डॉ. श्रीकांत आवारे यांना काही ग्रामस्थांनी या रस्ता दुरुस्तीसाठी साकडे घातले आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता अर्थसाहाय्य देण्याचे कबूल केले. त्यानुसार तातडीने रस्त्याचे काम सुरूही करण्यात आले. या मार्गावर मोठ्या प्रमाणात मुरूम टाकण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांचा या पावसाळ्यातील प्रवास सुखकर होण्यास मदत झाली आहे. आता रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून होत आहे.  शिरवाडे ते फाटा या रस्त्याचे २० वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले होते. मात्र या रस्त्यावरून अवजड वाहतूक होत असल्याने रस्ता असून नसल्यासारखा झालेला होता. अधूनमधून छोटे-मोठे अपघातही होत असत. या रस्त्याचे काम व्हावे यासाठी नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा करूनही रस्त्याचे काम होत नव्हते.

Web Title: Doctor stays dressed in a self-arranged road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.