डॉक्टरांनीही जोडलं ‘रक्ताचं नातं’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:11 AM2021-07-03T04:11:20+5:302021-07-03T04:11:20+5:30

नाशिक : कोणत्याही सत्कार्याचा प्रारंभ समाजातील मान्यवरांनी केला की त्या कार्यावर आदर्शतेचे शिक्कामोर्तब हाेते. ‘लोकमत’तर्फे आयोजित रक्तदान शिबिर इंडियन ...

Doctors also added 'blood relationship'! | डॉक्टरांनीही जोडलं ‘रक्ताचं नातं’ !

डॉक्टरांनीही जोडलं ‘रक्ताचं नातं’ !

Next

नाशिक : कोणत्याही सत्कार्याचा प्रारंभ समाजातील मान्यवरांनी केला की त्या कार्यावर आदर्शतेचे शिक्कामोर्तब हाेते. ‘लोकमत’तर्फे आयोजित रक्तदान शिबिर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) शालिमारवरील सविता देसाई रुग्णालयात करण्यात आला. आयएमएच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक डॉक्टर्सनी ‘रक्ताचं नातं’ या अभियानात रक्तदान करून सामाजिक बांधीलकीचा आदर्श घालून दिला.

राज्यात कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने ‘लोकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘रक्ताचं नातं’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून ‘लोकमत’च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचा ‘डॉक्टर्स डे’ला शुभारंभ झाला. प्रायोजक दीपक बिल्डर्स आणि डेव्हलपर्स तसेच थिंक फाउंडेशन, विक्रम टी, योनो एसबीआय, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राज्य रक्तसंक्रमण परिषदेतर्फे(एसबीटीसी) यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिरांचा प्रारंभ करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. १) सकाळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड, डॉ. नितीन रावते, डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. कविता गाडेकर, डॉ. स्वाती वंजारी, डॉ. नीलेश जेजूरकर, नाशिक एनक्लेव्ह रोटरीचे रमेश मेहेर, संजय कलंत्री यांच्यासह अन्य मान्यवर डॉक्टर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

इन्फो

अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी केले रक्तदान

आयएमएच्या या रक्तदान शिबिरात अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीदेखील रक्तदान केले. एकावेळी दोन ते तीन खुर्च्यांवर रक्तदान करण्यात आल्याने सकाळपासून दुपारपर्यंत रक्तदात्यांचा उत्साहदेखील कायम होता. ‘रक्ताचं नातं’ उपक्रमातील या पहिल्याच शिबिरामध्ये दिवसभरात तब्बल ५० बाटल्यांचे रक्तसंकलन करण्यात आले.

इन्फो

येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातही रक्तदानाचा उपक्रम पार पडला. या रक्तदान शिबिरात कर्मचाऱ्यांनी स्वच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन मुक्त विद्यापीठाचे कुलगरू ई. वायुनंदन यांनी केले होते. या शिबिरास कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

फोटो

प्रशांत खरोटे फोटो टाकणार आहेत.

Web Title: Doctors also added 'blood relationship'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.