झुंडशाहीमुळे डॉक्टर्स भयभीत : विक्रम गोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:40 AM2019-06-24T00:40:37+5:302019-06-24T00:40:58+5:30
डॉक्टर हा रुग्णाला जीवदान देण्यासाठी तयार झालेला असतो. रुग्णाचा मृत्यू व्हावा, यासाठी तो कधीही तयार नसतो. अखेरच्या क्षणापर्यंत सेवाव्रती डॉक्टर आपले कौशल्य पणाला लावून रुग्ण दगावू नये, यासाठी झटत असतो; मात्र समाजातील अपप्रवृत्तीचे लोक हे समजून घेणारे नाही.
नाशिक : डॉक्टर हा रुग्णाला जीवदान देण्यासाठी तयार झालेला असतो. रुग्णाचा मृत्यू व्हावा, यासाठी तो कधीही तयार नसतो. अखेरच्या क्षणापर्यंत सेवाव्रती डॉक्टर आपले कौशल्य पणाला लावून रुग्ण दगावू नये, यासाठी झटत असतो; मात्र समाजातील अपप्रवृत्तीचे लोक हे समजून घेणारे नाही. त्यामुळे झुंडशाही फोफावत असून, या देशातील सेवाव्रती डॉक्टर भयभीत झाला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित गंगापूररोडवरील श्री गुरुजी रुग्णालयाच्या वतीने आयोजित ‘संकल्पातून सिद्धीकडे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात गोखले प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. रविवारी (दि.२३) रावसाहेब थोरात सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ उद्योजक हेमंत राठी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल भालेराव, गुरुजी रुग्णालयाचे अध्यक्ष विनायक गोविलकर, डॉ. अनंत पंढरे, प्रवीण बुरकुले उपस्थित होते. यावेळी गोखले यांनी गुरुजी रुग्णालयात सेवाव्रती म्हणून आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला करून देणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांविषयी चिंता व्यक्त लेखिका वंदना अत्रे यांनी मनोगत व्यक्त केले़ प्रास्ताविक गोविलकर यांनी केले व सूत्रसंचालन सोनाली तेलंग यांनी केले.
या देशात ५५ वर्षांत बहुतांश राजकारण्यांनी लोकांना फुकट मागण्याची सवय लावली. ज्या लायकीचे लोक असतात त्यांना त्याच लायकीचे सरकार मिळते, असेही गोखले म्हणाले. आंबेडकरांसारख्या महान व्यक्तिमत्त्वाचे विचारही अंगीकारावे, असे गोखले म्हणाले.