मालेगावातही डॉक्टरांचे ‘टास्क फोर्स’ : टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 11:12 PM2020-04-29T23:12:36+5:302020-04-29T23:30:40+5:30

नाशिक : उत्तर महाराष्टÑातील तज्ज्ञ डॉक्टरांची पथके तयार करून मुंबईच्या धर्तीवर त्यांचे ‘टास्क फोर्स’ तयार करण्यात येणार आहेत. मालेगाव शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता या लढाईत हे डॉक्टर्स आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे मालेगावातून कोरोना हद्दपार करण्यासाठी आता संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात येणार आहे, असे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मिशन मालेगाव यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी आवश्यक पावले उचलत प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.

 Doctors' task force in Malegaon too: Tope | मालेगावातही डॉक्टरांचे ‘टास्क फोर्स’ : टोपे

मालेगावातही डॉक्टरांचे ‘टास्क फोर्स’ : टोपे

Next

नाशिक : उत्तर महाराष्टÑातील तज्ज्ञ डॉक्टरांची पथके तयार करून मुंबईच्या धर्तीवर त्यांचे ‘टास्क फोर्स’ तयार करण्यात येणार आहेत. मालेगाव शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता या लढाईत हे डॉक्टर्स आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे मालेगावातून कोरोना हद्दपार करण्यासाठी आता संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात येणार आहे, असे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मिशन मालेगाव यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी आवश्यक पावले उचलत प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. टोपे म्हणाले की,
मुंबईतील एका रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर करण्यात आलेली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्याचे मला नुकतेच समजले असल्याचे टोपे यांनी सांगितले.
--------
डॉक्टर कामावर न आल्यास निलंबन
मालेगावात डॉक्टर्स वाढवून देण्याची मागणी होती त्यानुसार डॉक्टर्सची नेमणूक करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र अद्यापही सुमारे २० डॉक्टर कामावर हजर झालेले नाहीत, हे डॉक्टर २४ तासात कामावर न आल्यास त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. दरम्यान, मालेगावातील खासगी डॉक्टरांना दवाखाने सुरू करण्याचे आवाहन करतानाच दवाखाने सुरू न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
--------
रिक्त जागा भरण्याचे आदेश
जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील रिक्त जागा त्वरित भरण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. त्याकरिता उमेदवारांचे अर्जही मागविण्यात आले आहेत. मात्र काही तांत्रिक कारणास्तव या प्रक्रि येत अडथळा निर्माण झाला आहे. परंतु, हे तांत्रिक दोष दूर करून लवकरात लवकर ही भरती प्रक्रि या पूर्ण करण्यात येईल, असे टोपे यांनी नमूद केले.

Web Title:  Doctors' task force in Malegaon too: Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक