कागदोपत्री बीएलओ दाखवून मानधन लाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 03:28 PM2018-05-10T15:28:21+5:302018-05-10T15:28:21+5:30

मतदार यादी व निवडणूक आयोगाच्या विविध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मतदान केंद्र निहाय नेमलेल्या बीएलओंच्या नेमणूका व मानधन वाटपात लाखो रूपयांचा घोटाळा झाल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणताच त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या संदर्भात जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघात नेमलेल्या सर्व बीएलओंची खात्री करण्यासाठी लवकरच त्या त्या मतदार संघात बैठक घेण्याचा विचार सुरू झाला आहे.

The documentary bribe was shown by the documentary BLO | कागदोपत्री बीएलओ दाखवून मानधन लाटले

कागदोपत्री बीएलओ दाखवून मानधन लाटले

Next
ठळक मुद्देमित्र, मैत्रिणींनाही लाभ : अधिका-यंचे दुर्लक्ष कारणीभूत

नाशिक : निवडणूक आयोगाच्या कामासाठी बीएलओंची नेमणूक करण्याची तरतूद असली तरी, निवडणुकीच्या कामाकडे ‘नॉन प्रॉडक्टीव्ह वर्क’ म्हणून पाहण्याची महसूल अधिकाऱ्यांच्या मानसिकतेचा फायदा घेत मालेगावच्या निवडणूक कर्मचा-याने चक्क आपल्या मित्र, मैत्रिणींना व पत्नीला बीएलओ (ब्लॉक लेव्हल आॅफिसर) म्हणून कागदोपत्री दाखवून त्यांच्या नावे दरवर्षी बॅँकेत जमा होणा-या रकमेचा अपहार केला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षापासून हा सारा प्रकार सुरू असताना तहसिलदार वा निवडणूक नायब तहसिलदारांनी त्याकडे सोयीस्कर भुमिका घेतल्याचेही बोलले जात आहे.
मतदार यादी व निवडणूक आयोगाच्या विविध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मतदान केंद्र निहाय नेमलेल्या बीएलओंच्या नेमणूका व मानधन वाटपात लाखो रूपयांचा घोटाळा झाल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणताच त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या संदर्भात जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघात नेमलेल्या सर्व बीएलओंची खात्री करण्यासाठी लवकरच त्या त्या मतदार संघात बैठक घेण्याचा विचार सुरू झाला आहे. विशेष करून मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या दोन मतदार संघाबरोबरच नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदार संघातील बीएलओंच्या नेमणूकीबाबत प्रशासन साशंक आहे. प्रत्येक मतदार संघनिहाय बीएलओंची नेमणूक करण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवून त्यांच्या नावे निवडणूक आयोगाकडून मिळणारे मानधनाची लाखो रूपयांची रक्कम खर्ची दाखविली जात असून, प्रत्यक्षात बीएलओंचे कामकाज मात्र दिसून येत नाही. त्यामुळे काम न करता बीएलओंना मानधनाची रक्कम कशाच्या आधारे अदा केली जाते असा प्रश्नही उपस्थित केला जात असून, एकतर बीएलओंची नेमणूक न करताच त्यांच्या नावे रक्कम काढली जात असावी किंवा काम न करताच बीएलओंना मानधन अदा केले जात असावे या दोहोंपैकी एक काही तरी खरे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मालेगाव येथील निवडणूक कर्मचारी सोनवणे याने तर बीएलओंच्या मानधनाची रक्कम आपली पत्नी, मैत्रिण, मित्र व त्याच्या मैत्रिणीच्या नावे बॅँकेत जमा करून हजारो रूपये हडप केल्याचे उघडकीस आले आहे. याचाच अर्थ बीएलओंची नेमणूक न करताच कागदोपत्री तसे दाखविण्यात आले आहे. सदरची बाब उघडकीस येवून बराच महिन्यांचा कालावधी लोटला परंतु त्याविरूद्ध फौजदारी कारवाई करण्यास अधिका-यांकडून प्रारंभी टाळाटाळ करण्यात आली त्यानंतर मात्र स्वत:वर बालंट येण्याची शक्यता पाहून तक्रार देण्यात आली आहे.

Web Title: The documentary bribe was shown by the documentary BLO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.