कुणी जागा देता का जागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 09:42 PM2020-04-02T21:42:17+5:302020-04-02T21:42:40+5:30

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला बाजारपेठ इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरूकेल्या आहेत. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांनी यात आडकाठी आणत जागा देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे जागेअभावी शेतकऱ्यांचा शेतमाल पडून आहे. भाजीपाला मार्केटसाठी कुणी जागा देता का जागा, अशी आर्जव शेतकरी करीत आहेत.

Does anyone give space? | कुणी जागा देता का जागा!

घोटी येथील भाजीपाला बाजारपेठ बंद झाल्यामुळे मालुंजे येथील शेतकऱ्याचा घरातच पडून राहिलेला माल.

Next
ठळक मुद्देघोटीला भाजी मार्केटवर प्रश्नचिन्ह : कोरोनाच्या भीतीमुळे जागा देण्यास विरोध

नांदूरवैद्य : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला बाजारपेठ इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरूकेल्या आहेत. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांनी यात आडकाठी आणत जागा देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे जागेअभावी शेतकऱ्यांचा शेतमाल पडून आहे. भाजीपाला मार्केटसाठी कुणी जागा देता का जागा, अशी आर्जव शेतकरी करीत आहेत.
दरम्यान, आमदार हिरामण खोसकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संदीप गुळवे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांनी जागेसाठी पाहणी केली. इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाºया घोटी येथे तालुक्यातील शेतकरी आपला शेतमाल घेऊन येतो; परंतु कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून काळजी घेण्यासाठी इगतपुरीचे आमदार खोसकर व घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे गुळवे यांनी शेतकºयांच्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील अनेक ठिकाणी जागेची पाहणी केली. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यात बाजार समिती बंद असल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांचा कष्टाने पिकवलेला टोमॅटो, कोबी, वांगी, बटाटे आदी भाजीपाला घरातच पडून असल्यामुळे शेतकºयांना आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून कोरोना साथ संपेपर्यंत स्थानिक दोन ते चार व्यापाºयांनी मिळून शेतकºयांच्या घरी जाऊन माल खरेदी करावा व तो माल मुंबई येथील व्यापाºयांना पोहोच करावा. यामुळे स्थानिक शेतकºयांच्या मालाचे नुकसान न होता त्यांना आर्थिक हातभार लागेल, असा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांनी
सांगितले.
कोरोनामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकºयांच्या घरात पडून राहिलेला माल खराब होत असल्यामुळे जनावरांसमोर टाकण्यात आल्याचे यावेळी सांगितले. बाजार समितीने त्वरित जागेची व्यवस्था करावी शेतमालाचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकºयांनी केली आहे.
तालुक्यातील शेतकºयांच्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी आम्ही शेतकºयांना भाजीपाला एकाच ठिकाणी विक्र ी करता यावा यासाठी चार ते पाच ठिकाणी जागेची पाहणी केली. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांकडून जागा देण्यास विरोध होत आहे. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत दोन ते चार व्यापाºयांनी शेतकºयांच्या घरी जाऊन माल खरेदी करावा व तो माल मुंबई येथील व्यापाºयांना पाठवावा, अशी ठरविण्यात आले असे गुंजाळ यांनी सांगितले.

Web Title: Does anyone give space?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.