माझ्या शब्दाला काही किंमत आहे की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:14 AM2021-05-15T04:14:45+5:302021-05-15T04:14:45+5:30

काठीपाडा येथे वैद्यकीय सेवा संस्थेत आयोजित कोविड उपाययोजना प्रतिबंधक आढावा बैठकीत बनसोड बोलत होत्या. यावेळी सरपंचांना ...

Does my word have any value? | माझ्या शब्दाला काही किंमत आहे की नाही?

माझ्या शब्दाला काही किंमत आहे की नाही?

Next

काठीपाडा येथे वैद्यकीय सेवा संस्थेत आयोजित कोविड उपाययोजना प्रतिबंधक आढावा बैठकीत बनसोड बोलत होत्या. यावेळी सरपंचांना मार्गदर्शन करताना बनसोड म्हणाल्या की, लोक सरकारी रुग्णालयात उपचार का घेत नाहीत. सरकारी डाॅक्टरांवरचा विश्वास का उडाला आहे, याचा गांभीर्य पूर्वक विचार करण्याची वेळ आलेली आहे. कोरोनाचे वास्तव भयंकर असल्याने गावातील नागरिकांनीच पुढे येऊन आपल्या गावाची काळजी घ्यायला हवी. याकामी सरपंच, पोलीस पाटील यांनी विशेष लक्ष द्यावे. लग्न समारंभ,अंत्यविधी, दशक्रिया विधी अशा ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. शासनाकडील यंत्रणा आता तोकडी पडते आहे. त्यामुळे पोलिसांना कारवाई करण्याची वेळच शासनावर येऊ देऊ नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.

या वेळी आमदार नितीन पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आदिवासी सेवक चिंतामण गावित, तहसिलदार किशोर मराठे, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, विस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ,काशिनाथ गायकवाड तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, आयुर्वेद तज्ञ डॉ.विक्रांत जाधव, उपसभापती इंद्रजीत गावित, सदस्य एन.डी.गावित,डॉ. विनय कुमावत,डॉ. वसंत गावित, सहायक पोलीस निरीक्षक सागर नांद्रे, भालेराव,आदि उपस्थित होते.

इन्फो

तालुक्याचा लसीचा हिस्सा मिळणार

पेठ, सुरगाणा तालुक्याच्या वाटेला आलेला लसीचा वाटा दुसरीकडे वळविण्यात येणार नाही. लसीचा पुरवठा देशपातळीवरच कमी आहे. तो सुरळीत झाल्यावर १८ ते ४४ वयोगटाला लस देण्यात येईल. असेही बनसोड यांनी सांगितले. यावेळी सीताराम पवार यांनी उंबरठाण येथील रिक्तपदे भरण्याची मागणी केली. तसेच कोरोना लसीकरणा बाबत आदिवासी बोली डांगी व कोकणी भाषेत जनजागृती करणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक रतन चौधरी यांनी जनतेला केलेले आवाहन याचे सादरीकरण करण्यात आले.

फोटो- १४ लीना बनसोड

काठीपाडा ता. सुरगाणा येथे कोविड उपाययोजना आढावा बैठकीप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,आमदार नितीन पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी.

===Photopath===

140521\14nsk_40_14052021_13.jpg

===Caption===

फोटो- १४ लीना बनसोड काठीपाडा ता. सुरगाणा येथे कोविड उपाययोजना आढावा बैठकीप्रसंगी  जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर,आमदार नितीन पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड आदी.

Web Title: Does my word have any value?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.