समाजाला साहित्य नक्की हवंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 02:10 AM2019-06-19T02:10:44+5:302019-06-19T02:11:27+5:30

आपल्या समाजाला नक्की साहित्य हवंय का ? माणसे काही वाचतात की नाही ? त्यांना त्याची निकड वाटते का, असे प्रश्न साहित्यिक म्हणून आपल्याला पडतो. पण लेखकाने गणितज्ज्ञ रामानुजमसारखे मला येतंय म्हणून मी गणित करतो, अशा भावनेनेच निर्मिती करायला हवी, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी व्यक्त केले.

Does the society want literature? | समाजाला साहित्य नक्की हवंय का?

यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाच्या वतीने कुसुमाग्रज राष्टÑीय साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व दिग्दर्शक वेद राही यांना तसेच बाबूराव बागुल कथा पुरस्कार गडचिरोली येथील प्रमोद बोरसरे तसेच गोवा येथील दयाराम पाडलोस्कर व विशाखा काव्य पुरस्कार नांदेड येथील अमृत तेलंग, पुणे येथील योजना यादव, नाशिकचे महेश लोंढे यांना ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विजेत्यांसमेवत विद्यापीठाचे कुलगुरु ई. वायुनंदन व कुसुमाग्रज अध्यासनाच्या संचालक प्रा. विजया पाटील.

Next
ठळक मुद्देश्याम मनोहर यांचा सवाल : कुसुमाग्रज राष्टÑीय साहित्य पुरस्कार वेद राही यांना प्रदान

नाशिक : आपल्या समाजाला नक्की साहित्य हवंय का ? माणसे काही वाचतात की नाही ? त्यांना त्याची निकड वाटते का, असे प्रश्न
साहित्यिक म्हणून आपल्याला पडतो. पण लेखकाने गणितज्ज्ञ रामानुजमसारखे मला येतंय म्हणून मी गणित करतो, अशा भावनेनेच निर्मिती करायला हवी, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाच्या वतीने श्याम मनोहर यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक वेद राही यांना कुसुमाग्रज राष्टÑीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू ई. वायुनंदन आणि कुसुमाग्रज अध्यासनच्या संचालिका प्रा. विजया पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
‘मी थोडं काहीतलं आणि बरंचसं बाहीतलं बोलणार आहे,’ असे सांगत श्याम मनोहर यांनी त्यांची मते रोखठोकपणे मांडली. ‘कोणताही राष्टÑीय पुरस्कार मिळाल्याने तो लेखक अन्य भाषकांना प्रथम माहिती होतो. पण तेवढ्यावर ही प्रक्रिया थांबायला नको. तर त्या लेखकाचे साहित्य, त्याचे विचार हे अन्य भाषांमध्ये भाषांतरीत होत पुढे जायला हवे. असे राष्टÑीय स्वरूपाचे साहित्य वाचन करून त्याची यादी नवोदित लेखकांनी तयार करावी. तसेच त्यांचे साहित्य अधिकाधिक भारतीय भाषांमध्ये प्रसारित करण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी पुरस्कारार्थींच्या वतीने दयाराम पाडलोस्कर आणि योजना यादव यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव दिनेश भोंडे यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि मानपत्रवाचन दत्ता पाटील यांनी केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी सूत्रसंचालन केले.
मानधन मिळणे
हा लेखकाचा हक्क
जगभरातील विविध भाषांमधील लेखक काय ज्ञान निर्माण करीत आहेत, ते सजगपणे पाहून त्याचा पट मांडला जायला हवा. लेखकाला पुरस्कार मिळणे, हा त्याचा हक्क नाही, मात्र मानधन मिळणे हा त्याचा हक्क आहे. पण पूर्णवेळ साहित्यिक बनून त्यावरच उपजीविका चालवणे, हे आपल्या संस्कृतीत तरी शक्य नाही. तरीदेखील लेखकाने ध्यासाने लेखन करीत रहावे. रात्री-अपरात्री काही सुचले तरी ते लिहून ठेवावे,’ असेही श्याम मनोहर यांनी सांगितले.
बागुल-विशाखा पुरस्कारांचे वितरण
विद्यापीठाच्या अन्य राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरणदेखील
करण्यात आले. बाबूराव बागुल कथा पुरस्कार गोवा येथील
दयाराम पाडलोस्कर (खपली निघाल्यानंतर- २०१७ सालासाठी)
तसेच गडचिरोली येथील प्रमोद बोरसरे (पारवा- २०१८ सालासाठी) यांन प्रदान करण्यात आला तर विशाखा काव्याचा प्रथम पुरस्कार
नांदेड येथील अमृत तेलंग (काव्य संग्रह: पुन्हा फुटतो भादवा),
द्वितीय पुरस्कार पुणे येथील कवयित्री योजना यादव
(मरी मरी जाय शरीर), तर नाशिकच्या महेश लोंढे
(निद्रानाशाची रोजनिशी) यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राष्टÑाचा आत्मा महाराष्टÑात : वेद राही
पुरस्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना प्रख्यात साहित्यिक आणि चित्रपट दिग्दर्शक वेद राही यांनी, ‘भारताचा आत्मा हा महाभारतात, तर राष्टÑाचा आत्मा महाराष्टÑात वसलेला आहे. महाभारतात गीता तर महाराष्टÑातील ज्ञानेश्वरीत अद्भुत ज्ञान सामावले आहे. माझा कुसुमाग्रजांशी संबंध त्यांच्या ज्ञानेश्वरीवरील एका पुस्तकामुळे आला. तर नाशिकचेच ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक मो. ग. तपस्वी यांनी ज्ञानेश्वरीवर केलेल्या हिंदी अनुवादामुळे मला ज्ञानेश्वरी उमगली. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव वाचून मी अक्षरश: स्तब्ध झालो होतो.
च् वीर सावरकर या चित्रपटासाठी लेखन आणि दिग्दशर््ान करताना मला खरंच जगणं कशाला म्हणतात, त्याचा अर्थ उमगला. या सर्व कारणांमुळेच माझ्यासाठी हा पुरस्कार खूप विश्ोष आहे. कुसुमाग्रजांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्काराने माझ्या मनात अजून एक ज्ञानदिवा उजळला आहे, ’ असे सांगत राही यांनी त्यांचे आणि नाशिकचे ऋणानुबंध नमूद केले. यावेळी राही यांनी कुसुमाग्रजांच्या एका कवितेचा अनुवाद करीत ‘जाते जाते गाऊंगा मै, गाते गाते जाऊंगा मै’’ हे काव्यदेखील सादर केले.

Web Title: Does the society want literature?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.