हिमाचल प्रदेशातून येते अमली ‘कुत्ता’ गोळी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:14 AM2018-12-06T00:14:36+5:302018-12-06T00:14:46+5:30
नाशिक : मालेगाव शहरात बंदी घातलेल्या; परंतु अंमल आणणाऱ्या ‘कुत्ता’ गोळीचा मुख्य स्रोत हिमाचल प्रदेश असून, गुजरातच्या सुरतमार्गे चोरी-छुप्या पद्धतीने त्या मालेगावी पाठविण्यात येत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असले तरी, मती गुंग करणाºया व काहीशा जीविताला धोका निर्माण करणाºया या गोळ्यांच्या विक्रीवर निर्बंध लादण्याच्या दृष्टीने विशेष शोध मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून मालेगाव शहरात कुत्ता गोळीची विक्री व सेवनाचे प्रमाण वाढले असून, कमी पैशात मती
गुंग करणारी नशा देणाºया या गोळीच्या सेवनाने कितीही तास व्यक्ती नशेच्या अधीन जाऊन कोणतेही कृत्य करण्यास धजावतो. सामाजिकदृष्ट्या अतिशय गंभीर असलेले हे औषध शेड्युल ड्रग्जमध्ये मोडले जाते. डॉक्टरांच्या प्रिस्किप्शनशिवाय या गोळीची विक्री, साठवणूक करता येत नसतानाही मालेगावी सहजपणे या गोळ्या उपलब्ध होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस खात्याने या गोळ्यांचे सेवन करणारे तसेच तस्करीच्या मार्गाने विक्री करणाºया काहींना ताब्यात घेतले. त्या आधारे केलेल्या चौकशीत हिमाचल प्रदेशात या कुत्ता गोळीचे उत्पादन केले जात असल्याची प्रथमदर्शनी माहिती हाती आली आहे. गुजरातच्या सुरत, अहमदाबाद तसेच मध्य प्रदेशातील भोपाळमार्गे मालेगावी या गोळ्या तस्करांमार्फत पोहोचविल्या जातात. याबाबत अन्न व औषध प्रशासनाने काही औषध विक्रेत्यांकडे चौकशी केली असता, सदरच्या गोळ्या या औषध विक्रेत्यांकडून घेतलेल्या नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गोळ्या पुरविणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, तरुणांना या गोळीच्या माध्यमातून व्यसनाधीन करण्याचे षडयंत्र आहे की काय अशी शंकाही बोलून दाखविली जात आहे. अॅक्शन प्लॅन तयार करणार
च्बुधवारी यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांना बोलावून आगामी पंधरा दिवस स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या. त्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्यात येत असून, या तपासणीचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. शासन पातळीवर या गोळ्यांचा पुरवठा रोखण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास केला जात आहे.