कुत्र्यांना खाजरा आजाराची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2022 12:10 AM2022-02-01T00:10:33+5:302022-02-01T00:11:04+5:30
अस्ताणे : मालेगाव परिसरातील भटकंती करणारे श्वान खाजरा आजाराने त्रस्त झाले असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अस्ताणे : मालेगाव परिसरातील भटकंती करणारे श्वान खाजरा आजाराने त्रस्त झाले असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
प्रत्येक गावात श्वान पाळले जातात. लहान मुलांना तर श्वान खूपच आवडतात. त्यांना ते उचलतात, त्यांच्या बरोबर खेळतात. त्यामुळे श्वानांना आजार लागण्याची शक्यता आहे. भटकंती करणाऱ्या श्वानांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. या भटकंती करणारे श्वानांना खाजरा आजार लागल्याने ते संपूर्ण अंग खाजतात. त्यामुळे त्यांच्या अंगावरचे केस निघत असतात आणि त्यामुळे त्यांना जखमा होतात. त्यात जंत पडून त्यांचा मृत्यूही होत असतो.
गावातील श्वानांना खाजरा आजार लागल्याने त्यांचा इफेक्ट नागरिकांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. कारण गावात मोकाट कुत्री फिरताना त्यांचे केस पडतात. त्यांना जखमा होतात. त्यामुळे त्यांना कुणी भाकरी न टाकताच हाकलून देतात. खायला मिळेल या आशेने फिरणाऱ्या कुत्र्यांना मात्र हाकलून लावताना दिसत आहे. त्यामुळे आजार जडलेल्या श्वानांवर उपचार करण्याची मागणी केली जात आहे.