थकबाकीदार मतदानापासून वंंचित

By admin | Published: January 28, 2015 11:49 PM2015-01-28T23:49:15+5:302015-01-28T23:52:23+5:30

सहकारी संस्था निवडणूक : १५ विविध कार्यकारी संस्थांची मतदार यादी प्रसिद्ध

Dold by dull voters | थकबाकीदार मतदानापासून वंंचित

थकबाकीदार मतदानापासून वंंचित

Next

कळवण : तालुक्यातील १५ विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्या असून, त्यातून थकबाकीदार सभासदांची नावे कमी करण्यात आली आहेत. ९७व्या घटनादुरुस्तीनुसार होणाऱ्या निवडणुकीतून थकबाकीदार सभासद मतदार यादीतून गायब झाले आहेत. २०१३मध्ये झालेल्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम सुधारणानुसार दि. ३१ आॅक्टोबर २०१४ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे यांनी कळवण तालुक्यातील १५ विविध कार्यकारी संस्थांसह जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्र म जाहीर केला आहे. १५ विविध कार्यकारी संस्थांच्या अंतिम मतदार याद्या सहाय्यक निबंधक कार्यालय व विविध कार्यकारी संस्था कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी संस्थेची प्रारूप मतदार यादी २३ जानेवारी २०१५ रोजी प्रसिद्ध केली असून, मतदार यादीवर २५ जानेवारीपर्यंत हरकती नोंदविल्या जाणार आहेत. त्यावर ११ फेब्रुवारी २०१५ रोजी निर्णय होऊन १३ फेब्रुवारी २०१५ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तालुक्यातील १५ विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये भेंडी विविध कार्यकारी संस्था, वरखेडा आदिवासी विविध कार्यकारी संस्था, मोकभणगी विविध कार्यकारी संस्था, विठेवाडी आदिवासी विविध कार्यकारी संस्था, अभोणा आदिवासी विविध कार्यकारी संस्था, सिद्धेश्वर आदिवासी विविध कार्यकारी संस्था, गुरुकृपा आदिवासी विविध कार्यकारी संस्था, वडाळे आदिवासी विविध कार्यकारी संस्था, देसगाव आदिवासी विविध कार्यकारी संस्था, विविध कार्यकारी संस्था, पाटविहीर आदिवासी विविध कार्यकारी संस्था, गणोरे आदिवासी विविध कार्यकारी संस्था, हिंगवे आदिवासी विविध कार्यकारी संस्था, गोपाळखडी आदिवासी विविध कार्यकारी संस्था व ओतूर आदिवासी विविध कार्यकारी संस्था या संस्थांचा समावेश आहे. त्यांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत निवडणुकीमुळे आदिवासी व ग्रामीण भागातील वातावरण पुन्हा तापणार असून, मोर्चेबांधणीला प्रारंभ झाला आहे.
९७व्या घटना दुरुस्तीमुळे सहकारी संस्था अधिनियमात बदल झाल्याने विविध कार्यकारी संस्थांच्या निवडणुकीचे निकष बदलले आहेत. सहकारी संस्था अधिनियमानुसार विविध कार्यकारी संस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, नागरी पतसंस्था, सहकारी बँक यांच्या थकबाकीदार सभासदांचा मतदानाचा अधिकार घटनादुरुस्तीने संपुष्टात आला आहे. थकबाकीदार सभासदांना मतदाना-पासून वंचित राहावे लागणार आहे. नियमित कर्जदारालाच आता गावाच्या विविध कार्यकारी संस्थेचे संचालक होता येणार आहे. त्यामुळे अनेकांची स्वप्ने भंगणार आहेत. नवीन रचनेत बिगर कर्जदार व आर्थिक दुर्बल घटक नसतानाही आर्थिक दुर्बल घटक जागेवर निवडणूक लढविणाऱ्या सभासदावर गंडांतर आले आहे.
बिगर कर्जदार व आर्थिक दुर्बल घटक या जागा कमी केल्याने संचालक संख्या १७ वरून १३ केली आहे , तालुक्यात होवू घातलेल्या पहिल्या टप्प्यातील विविध कार्यकारी संस्था निवडणुकीत केवळ कर्जदार सभासदाला निवडणुकीत उभे राहता येणार आहे बिगर कर्जदारांना संचालक पदापासून दूर जावे लागणार आहे . सहकारी संस्था निवडणुकीमध्ये आचारिसहता लागू केली असून तिचे पालन करावे लागणार आहे. सार्वित्रक निवडणुकीप्रमाणे अर्ज दाखल केल्यापासून मतदान संपेपर्यंत खर्चाचा हिशोब सादर करावा लागणार आहे

Web Title: Dold by dull voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.