देशी-विदेशी दारू दुकाने अन् बियर बारदेखील करा बंद : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 02:21 PM2020-03-21T14:21:14+5:302020-03-21T14:22:01+5:30

हे आदेश साथरोग नियंत्रण कायदा १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार दिलेले असून ते सर्वच्या सर्व म्हणजे पंचतारांकित हॉटेलपासून लहान ठेल्यापर्यंत तसेच रिसॉर्ट आदिंनाही लागू आहेत

Domestic and foreign liquor shops and beer bars also closed: Collector | देशी-विदेशी दारू दुकाने अन् बियर बारदेखील करा बंद : जिल्हाधिकारी

देशी-विदेशी दारू दुकाने अन् बियर बारदेखील करा बंद : जिल्हाधिकारी

googlenewsNext
ठळक मुद्देकायदेशीर कार्यवाही करण्यात येईल

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मद्यविक्र ीची दुकाने व बारमध्ये होणारी गर्दी नियंत्रित करणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारे होणारी मद्य विक्र ी व बार शनिवारपासून (दि.२१) पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.
या संदर्भात जारी करण्यात आदेशात मांढरे यांनी म्हटले आहे, शासनाने कोव्हीड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १९८७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू केला आहे. या कायद्याच्या खंड २, ३ व ४ आणि नियमावली मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्ह्यातील सर्व बार ,देशी दारू किरकोळ विक्र ी, विदेशी दारू विक्र ी, बार, क्लब आणि मद्य विक्र ीचे सर्व परवाने अथवा दुकाने आज २९ मार्च २०२० रोजीच्या सायंकाळी सहा वाजेपासून पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
हे आदेश साथरोग नियंत्रण कायदा १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार दिलेले असून ते सर्वच्या सर्व म्हणजे पंचतारांकित हॉटेलपासून लहान ठेल्यापर्यंत तसेच रिसॉर्ट आदिंनाही लागू आहेत या आदेशाचे एखाद्या व्यक्तीने अथवा संस्थेने उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० ( ४५ ) च्या कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानले जाईल व पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही मांढरे यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

Web Title: Domestic and foreign liquor shops and beer bars also closed: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.