घरगुती गॅसच्या दरात ९४ रुपयांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 12:17 AM2017-11-03T00:17:38+5:302017-11-03T00:17:43+5:30
नाशिक : केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ केली असून, गेल्या तीन महिन्यांतील ही तिसरी दरवाढ आहे. या दरवाढीची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आल्याने आता सिलिंडरसाठी ग्राहकांना ७३९ रुपये मोजावे लागतील. याबरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये तब्बल २२० रुपयांची वाढ झाल्याने त्याचा परिणाम सर्वच खाद्यपदार्थ विक्रीच्या दरवाढीत होणार आहे.
महागाईचा चटका : व्यावसायिक २२० रुपये
नाशिक : केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ केली असून, गेल्या तीन महिन्यांतील ही तिसरी दरवाढ आहे. या दरवाढीची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आल्याने आता सिलिंडरसाठी ग्राहकांना ७३९ रुपये मोजावे लागतील. याबरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये तब्बल २२० रुपयांची वाढ झाल्याने त्याचा परिणाम सर्वच खाद्यपदार्थ विक्रीच्या दरवाढीत होणार आहे.
तेल कंपन्यांना सरकारच्या नियंत्रणातून मुक्त केल्यानंतर केंद्र सरकारची पावले गॅसच्या बाबतीतही त्याच मार्गाने पडू लागली असून, घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर सरकार ग्राहकांना अनुदान देत असले तरी, वर्षाकाठी अनुदानित सिलिंडर वापराची मर्यादा बारा इतकीच ठेवण्यात आली आहे. महिन्याकाठी दोन सिलिंडर वापरणारीही कुटुंबे असल्याने त्यांना आता वाढीव दराने म्हणजेच खुल्या बाजारातील दराने सिलिंडर खरेदी करावे लागणार आहे.
गेल्या तीन महिन्यांत सातत्याने ही वाढ झाली असून, घरगुती वापराच्या १४ किलो वजनाच्या सिलिंडरची किंमत सप्टेंबर महिन्यात ५९६ रुपये तर आॅक्टोबर महिन्यात त्यात वाढ होऊन ६४५ रुपये इतकी झाली. नोव्हेंबर महिन्यात हेच दर आता ७३८ रुपये ५० पैसे इतके झाले आहेत.
त्यामुळे घरपोच गॅस सिलिंडर देणाºया कर्मचाºयाला आता ७५० रुपये देण्यावाचून ग्राहकांना पर्यायच राहिलेला नाही. अशाच प्रकारे व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरातही दर महिन्याला वाढ होत असून, १९ किलो वजनाच्या या गॅस सिलिंडरसाठी सप्टेंबरमध्ये १०८१ रुपये, आॅक्टोबर महिन्यात ११५८ रुपये व नोव्हेंबर महिन्यात १३०४ रुपये ५० पैसे इतके झाले आहेत. व्यावसायिक सिलिंडरचा वापर हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे, चहा टपरी, खानावळ चालकांकडूनच अधिक वापर केला जातो. आता थेट एका सिलिंडरमागे २२० रुपयांची वाढ झाल्यामुळे साहजिकच खाद्यपदार्थांच्या दरातही वाढ करण्याशिवाय व्यावसायिकांना पर्याय राहिलेला नाही. व्यावसायिक दर महागले व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरातही दर महिन्याला वाढ होत असून, १९ किलो वजनाच्या या गॅस सिलिंडरसाठी सप्टेंबरमध्ये १०८१ रुपये, आॅक्टोबर महिन्यात ११५८ रुपये व नोव्हेंबर महिन्यात १३०४ रुपये ५० पैसे इतके झाले आहेत. व्यावसायिक सिलिंडरचा वापर हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे, चहा टपरी, खानावळ चालकांकडूनच अधिक वापर केला जातो.