घरगुती गॅसच्या दरात ९४ रूपयांनी वाढ; व्यावसायिक २२० रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 07:19 PM2017-11-01T19:19:22+5:302017-11-01T19:25:32+5:30

तेल कंपन्यांना सरकारच्या नियंत्रणातून मुक्त केल्यानंतर केंद्र सरकारची पावले गॅसच्या बाबतीतही त्याच मार्गाने पडू लागली असून, घरगुती वापराच्या गॅस सिलींडरवर सरकार ग्राहकांना अनुदान देत असले तरी, वर्षाकाठी अनुदानीत सिलींडर वापराची मर्यादा बारा इतकीच ठेवण्यात आली आहे.

Domestic gas price hiked by Rs 94; Professional 220 Rs | घरगुती गॅसच्या दरात ९४ रूपयांनी वाढ; व्यावसायिक २२० रूपये

घरगुती गॅसच्या दरात ९४ रूपयांनी वाढ; व्यावसायिक २२० रूपये

Next
ठळक मुद्देगेल्या तीन महिन्यातील ही तिसरी दरवाढदरवाढीची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून

नाशिक : केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलींडरच्या दरात पुन्हा वाढ केली असून, गेल्या तीन महिन्यातील ही तिसरी दरवाढ आहे. या दरवाढीची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आल्याने आता सिलींडरसाठी ग्राहकांना ७३९ रूपये मोजावे लागतील. या बरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलींडरमध्ये तब्बल २२० रूपयांची वाढ झाल्याने त्याचा परिणाम सर्वच खाद्यपदार्थ विक्रीच्या दरवाढीत होणार आहे.
तेल कंपन्यांना सरकारच्या नियंत्रणातून मुक्त केल्यानंतर केंद्र सरकारची पावले गॅसच्या बाबतीतही त्याच मार्गाने पडू लागली असून, घरगुती वापराच्या गॅस सिलींडरवर सरकार ग्राहकांना अनुदान देत असले तरी, वर्षाकाठी अनुदानीत सिलींडर वापराची मर्यादा बारा इतकीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या कुटुंबात महिन्याकाठी दोन सिलींडर वापरणारीही कुटूंबे असल्याने त्यांना आता वाढीव दराने म्हणजेच खुल्या बाजारातील दराने सिलींडर खरेदी करावे लागणार आहे. गेल्या तीन महिन्यात सातत्याने ही वाढ झाली असून, घरगुती वापराच्या १४ किलो वजनाच्या सिलींडरची किंमत सप्टेंबर महिन्यात ५९६ रूपये तर आॅक्टोंबर महिन्यात त्यात वाढ होऊन ६४५ रूपये इतकी झाली. नोव्हेंबर महिन्यात हेच दर आता ७३८ रूपये ५० पैसे इतके झाले आहेत. त्यामुळे घरपोच गॅस सिलींडर देणाºया कर्मचाºयाला आता ७५० रूपये देण्यावाचून ग्राहकांना पर्यायच राहिलेला नाही. अशाच प्रकारे व्यावसायिक वापराच्या सिलींडरच्या दरातही दर महिन्याला वाढ होत असून, १९ किलो वजनाच्या या गॅस सिलींडरसाठी सप्टेंबरमध्ये १०८१ रूपये, आॅक्टोंबर महिन्यात ११५८ रूपये व नोव्हेंबर महिन्यात १३०४ रूपये ५० पैसे इतके झाले आहेत. व्यावसायिक सिलींडरचा वापर हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे, चहा टपरी, खाणावळ चालकांकडूनच अधिक वापर केला जातो. आता थेट एका सिलींडरमागे २२० रूपयांची वाढ झाल्यामुळे साहजिकच खाद्यपदार्थांच्या दरातही वाढ करण्याशिवाय व्यावसायिकांना पर्याय राहिलेला नाही.

Web Title: Domestic gas price hiked by Rs 94; Professional 220 Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.