दातलीत ‘ग्रामविकास’चे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:13 AM2021-01-22T04:13:44+5:302021-01-22T04:13:44+5:30
सिन्नर : तालुक्यातील दातली, केदारपूर आणि शहापूर ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत ११ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ८ ...
सिन्नर : तालुक्यातील दातली, केदारपूर आणि शहापूर ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत ११ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ८ जागांसाठी पंढरीनाथ आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार माणिकराव कोकाटे गटाच्या दंताळेश्वर ग्रामविकास पॅनेलचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. यात वॉर्ड क्रमांक १ मधील हेमंत आव्हाड, हेमंत भाबड, सुवर्णा शेळके तसेच वॉर्ड क्रमांक ४ मध्ये सीमा चांदोरे, दीपक सातपुते तर माजी आमदार वाजे गटाच्या लहानू भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली दंताळेश्वर विकास पॅनेलच्या वाट्याला केवळ ३ जागा आल्या आहेत. यात वॉर्ड क्रमांक २ मधील तीनही उमेदवार अॅड. दिलीप केदार, मनीषा भाबड, अलका पिंपळे हे विजयी झाले आहे. बहुमत असलेल्या ग्रामविकास पॅनेलसाठी सरपंचपद मिळवणे मोठ्या चुरशीचे ठरणार आहे. बिनविरोध असलेले वॉर्ड क्रमांक ३ मधील दौलत केकाण, नरहरी सोनवणे तसेच वॉर्ड क्रमांक ४ मधील अनिता भाबड या सदस्यांची सत्तास्थापनेसाठी भूमिका निर्णायक ठरणार आहे.
फोटो ओळी- दातली येथे जल्लोष करताना कार्यकर्ते. (२१ दातली)