लग्न सोहळ्यात अक्षता न टाकता धान्य केले दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:26 AM2019-05-27T00:26:16+5:302019-05-27T00:26:37+5:30
लग्न सोहळ्यात तांदळाच्या ‘अक्षता’ आशीर्वादासाठी टाकल्या जातात. हे तांदूळ सामान्यत: वाया जातात, पायदळी तुडवल्या जातात. मात्र, ही परंपरा खंडित करून नाशिकच्या सोनार-मोरे कुटुंबीयांनी अक्षतांऐवजी कुस्करलेल्या फुलांचा वापर केला
नाशिक : लग्न सोहळ्यात तांदळाच्या ‘अक्षता’ आशीर्वादासाठी टाकल्या जातात. हे तांदूळ सामान्यत: वाया जातात, पायदळी तुडवल्या जातात. मात्र, ही परंपरा खंडित करून नाशिकच्या सोनार-मोरे कुटुंबीयांनी अक्षतांऐवजी कुस्करलेल्या फुलांचा वापर केला आणि अक्षतांसाठी वापरण्यात येणारे १०१ किलो तांदूळ गरिबांसाठी दान केले. हे तांदूळ वधू-वरांकडून लायन्स पंचवटीच्या धान्य बँकेला दान करण्यात आले आणि अनोखी सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.
संजय सोनार मूळ राहणार लोणी प्रवरा येथील. त्यांच्या मुलाचा विवाह नाशिकमधील मोरे कुटुंबातील मुलीशी संपन्न झाला. मुलाच्या लग्नात एक नवीन प्रथा करण्याचे त्यांच्या मनात आले आणि त्यांनी अक्षता पायदळी तुडवून वाया घालविण्याऐवजी गरिबांना दिल्यास त्याची मदत होईल, अशी कल्पना आली. याप्रसंगी क्लबचे रमेश चौटालिया, प्रवीण जैक्र ीश्निया, मनीष अहिरे, राजेश कोठावदे, सुनील देशपांडे, कोहोक, विनोद पाटील उपस्थित होते. माजी प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव यांनी या प्रथेचा प्रसार लायन्सच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर करून त्याद्वारे विविध ठिकाणी धान्य बॅँक सुरू करण्यास मदत होईल.सांगितले.
भुकेलेल्यांना अन्न मिळेलच, परंतु त्याचबरोबर उदरभरण करण्याचे महत् पुण्य लाभेल, या हेतूने अक्षता टाकण्याच्या परंपरेला छेद दिला व १०१ किलो तांदूळ भेट दिला. लायन्स पंचवटीच्या धान्य बँकेच्या कार्यात त्यांचे नेहमीच सहकार्य असते. धान्य बँक हा उपक्र म चालवणारे सुजाता कोहोक, वैद्य नीलिमा जाधव, रितू चौधरी, अरु ण अमृतकर, मृणाल पाटील, यंदे, महेश सोमण यांनी आभार मानले. त्याचबरोबर अशाप्रकारचा उपक्रम सर्वांनी राबवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.